ETV Bharat / city

Big Breaking news Live Page : गँगस्टर सुरेश पुजारी याला १० दिवसांची पोलीस कोठडी

author img

By

Published : Dec 15, 2021, 9:01 AM IST

Updated : Dec 15, 2021, 5:48 PM IST

Breaking news
ब्रेकिंग न्यूज एका

17:45 December 15

थर्टी फस्ट आणि ख्रिसमसच्या पार्टीत कोरोनाचे नियम मोडल्यास हॉटल, सभागृहांवर कडक कारवाई

  • मुंबई - ३१ डिसेंबर, ख्रिसमससाठी पालिका ऍक्शन मोड मध्ये
  • ३१ डिसेंबर आणि ख्रिसमसच्या पार्शवभूमीवर पालिका प्रशासनाकडून दक्षता बाळगली जाणार
  • बंदिस्त सभागृह, बंदिस्त रेस्टॉरंट, हॉलमध्ये ५०% क्षमतेपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही
  • मोकळ्या जागी २५% क्षमतेपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही
  • ३१ डिसेंबर आणि ख्रिसमस निमीत्त होणा-या पार्ट्यांवर नजर ठेवण्याकरता प्रत्येक वॉर्ड मध्ये महापालिकेची ४ पथके तैनात असतील
  • नियम मोडणा-या पार्ट्या आढळल्यास संबंधित रेस्टॉरंट मालक, हॉटेलमालक यांच्यावरही नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल

16:22 December 15

गँगस्टर सुरेश पुजारी याला १० दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे - आरोपी सुरेश बसप्पा पुजारी यास मुख्य न्यायदंडाधिकारी, ठाणे यांचे समोर हजर केले

न्यायालयाने 25/12/2021 पर्यंत 10 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली

15:11 December 15

अभिनेत्री करीनाची मोलकरीण आणि सीमा खानची बहिण कोरोना संक्रमित

मुंबई - करीनाची मोलकरीण आणि सीमा खानची बहिण आधीच पॉझिटिव्ह आल्या होत्या.

त्यांच्या संपर्कात येऊन करीना कपूर आणि अमृता अरोरा पॉजिटीव्ह आल्या

सध्या 110 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या असून सर्व निगेटिव्ह आहेत

करीना कपूर, अमृता अरोरा, सीमा खान यांच्या इमारती सील करण्यात आल्या आहेत

14:22 December 15

आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

मुंबई उच्च न्यायालयाकडून बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणात दिलासा मिळाला आहे. २८ ऑक्टोबर रोजी आर्यन खानची जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर दर शुक्रवारी आर्यन खानला एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्याचं बंधन जामिनातील अट म्हणून घालण्यात आलं होतं. आता त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानला सूट दिली असून दर शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्याची अट शिथिल करण्यात आली आहे.

09:26 December 15

ठाणे - 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार

14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन नराधमाने केला तिच्यावर जंगलात बलात्कार

गणेशपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल

श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिले नराधमाला पोलिसांच्या ताब्यात

09:17 December 15

मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) सध्या 'मध्यम' श्रेणीमध्ये

एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR)-भारताच्या प्रणालीनुसार, मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) सध्या 'मध्यम' श्रेणीमध्ये 120 (एकूण) आहे.

07:53 December 15

Big Breaking news Live Page : वाचा आत्तापर्यंतच्या ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर, आर्यन खानला जामिनाच्या अटींमध्ये दिली सूट!

ठाणे - ठाण्यातील भिवंडी परिसरातील एका कॉम्प्लेक्सच्या गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

Last Updated : Dec 15, 2021, 5:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.