ETV Bharat / city

Big Breaking Live Page - वाचा आत्तापर्यंतच्या ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

author img

By

Published : Nov 22, 2021, 8:18 AM IST

Updated : Nov 22, 2021, 9:55 PM IST

Big Breaking Live Page Maharashtra :  वाचा आत्तापर्यंतच्या ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
BREAKING NEWS

19:36 November 22

BEED : तरुणाने तुरूंगातून घातला पाच देशातील नागरिकांना कोट्यवधींचा गंडा

बीड - येथील रहिवासी असलेल्या तरुणाने तुरुंगात बसून पाच देशातील नागरिकांना कोट्यवधींला गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे. तो सायबर गुन्हाअंतर्गत मध्यप्रदेशातील तुरूंगात शिक्षा भोगत होता. यावेळी त्याला दोन तुरूंग अधिकाऱ्यांनी दबाब टाकून त्याच्याकडून हॉकिंग करून घेतल्याची सांगितली जात आहे. अमर अनंत अग्रवाल असे त्या बीडच्या तरुणाचे नाव आहे. तो 2018 पासून भैरवगड येथील कारागृहात शिक्षा भोगत होता. तेव्हाच त्याचाकडून हे जबरदस्तीने काम करून घेण्यात आले, असा दावा आरोपीने पोलीस चौकशीत केला आहे. 

19:18 November 22

NCBचे नांदेड, जालना आणि औरंगाबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये छापे

NCBचे महाराष्ट्रातील नांदेड, जालना आणि औरंगाबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये छापे

18:13 November 22

मंत्री नवाब मलिक यांना ट्विट करण्याचा अधिकार - कोर्ट

मंत्री नवाब मलिक यांना दिलासा

कोर्टाचा ट्विट करण्यास मनाईचा आदेश देण्यास नकार

मंत्री नवाब मलिक ट्विट करु शकतात. 

16:24 November 22

गर्लफ्रेंडचा मोबाईल नंबर दिला नाही म्हणून तरुणावर व्हिडिओ शूट करत अनैसर्गिक अत्याचार..

पोलीसच भक्षक झाल्याची खळबळजनक घटना सांगली जिल्ह्यात उघडकीस आली आहे. इस्लामपूर शहरात महाविद्यालयीन युवकावर पोलिसानेच अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना रविवारी समोर आली. हा प्रकार २९ ऑक्टोबरला घडला असून या अत्याचाराची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत रविवारी पुन्हा अनैसर्गिक संभोग करण्याची मागणी या पोलिसाने केल्यावर युवकाने पोलिसात धाव घेतली. संशयित पोलिसाने पीडित युवकाकडून चार हजाराची खंडणीसुद्धा उकळली आहे. हणमंत कृष्णा देवकर (३४, रा. राजेबागेश्वरनगर, इस्लामपूर) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

13:01 November 22

काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित, भाजपचे संजय केनेकरांनी अर्ज मागे घेतला

मुंबई - भाजप उमेदवार संजय कणेकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार 

केनेकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज आज मागे घेतल्याने प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांची निवड बिनविरोध होणार

प्रज्ञा सातव या काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी

राजीव सातव हे राहुल ब्रिगेडचे नेते मानले जात होते

राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले होते 

12:47 November 22

परमबीर सिंग यांच्या जीवाला मुंबई पोलिसांकडून धोका, वकिलांची सर्वोच्च न्यायालयात माहिती

नवी दिल्ली -  परमबीर सिंग देश सोडून गेलेले नाहीत. त्यांच्या जीवाला मुंबई पोलिसांकडून धोका असल्याची माहिती सिंग यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. 

12:37 November 22

अभिनेत्री कंगना रणौतच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

  • मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतच्या घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहे
  • शीख समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे शीख समाज संतप्त आहे
  • शीख समुदायाचे लोक मोठ्या संख्येने कंगनाच्या खार पश्चिम येथील घराच्या दिशेने निघाले होते
  • त्यांना पोलिसांनी दूरवरच रोखले आहे
  • खार पोलिस स्टेशनने कंगनाच्या घराबाहेर चोख बंदोबस्त ठेवला आहे
  • शीख समुदाय कंगनाच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार आहे

12:23 November 22

आर्यन खानच्या जामीनाविरोधात NCB सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता

  • मुंबई -  आर्यन खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
  • आर्यनच्या जामीनाविरोधात एनसीबी सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता
  • एनसीबी कडून आर्यन च्या जामिनावर विरोधात सुप्रीम कोर्टात अपील करण्याची शक्यता
  • हायकोर्टाची जामीन ऑर्डर आल्यानंतर एमसीबी चे कायदे तज्ञांची चर्चा

12:11 November 22

शरद पवारांनी घेतली अनिल परब आणि अजित पवार यांची भेट

  • मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे
  • वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये ही भेट झाली असून त्यांच्यात बैठक सुरु आहे
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती
  • एसटी संपाबाबत मोठा निर्णय राज्य सरकार घेण्याची शक्यता
  • याआधी झालेल्या बैठकीत शरद पवारांनी एसटी संपाबाबत तोडगा काढण्याच्या सूचना केल्या होत्या

12:02 November 22

विधानपरिषद निवडणूक : चंद्रशेखर बावनकुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  • नागपूर - भारतीय जनता पक्षाचे नागपूर विभागातील उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, यांच्यासह अनेक आमदार आणि नेत्यांची उपस्थिती

11:13 November 22

अमरावती शहरात पुन्हा कडक संचारबंदीचे आदेश

  • अमरावती - शहरात पुन्हा कडक संचारबंदीचे आदेश
  • आज होणाऱ्या भाजप व 'वंचित'च्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीकवर संचारबंदीचा आदेश
  • शहरात सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कडक संचारबंदी
  • ५ पेक्षा जास्त नागरिक बाहेर दिल्यास कारवाईचा इशारा
  • तीन दिवस संचारबंदीत शिथिलता देण्यात आल्या नंतर पुन्हा नवीन नियम
  • पोलीस आयुक्त आरती सिंग यांचे आदेश

09:28 November 22

पुण्यामध्ये आजपासून रिक्षा भाड्यामध्ये वाढ

पिंपरी-चिंचवडकरांना आता आपला खिसा आणखी रिकामा करावा लागणार आहे. कारण आज पासून रिक्षा भाड्यामध्ये वाढ झाली आहे. आता पहिल्या 1.5 किमीसाठी 18 रुपयांऐवजी आता 21 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानंतर प्रत्येक किमीसाठी 14 रुपये नागरिकांकडून भाडे स्विकारले जाईल, असे पुणे विभागाच्या आरटीएने स्पष्ट केले आहे.
 

09:27 November 22

नाशिक मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक रोड प्रतिनिधी येथील मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने झाडाला चादर व अंगातील बनियानच्या साह्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सदर कैदी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

09:24 November 22

राज्यातील विविध विद्यापीठ व कॉलेज कर्मचाऱ्यांचा आज 'लाक्षणिक बंद'

गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करून देखील हे प्रश्न सुटत नसल्याने विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आज (सोमवार) राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबई विद्यापीठासह राज्यातील सर्व विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयाचे कामकाज ठप्प होणार आहे.

08:12 November 22

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लखनऊ दौरा

 पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन कृषी कायदे रद्द केल्याच्या घोषणेनंतर ते आज लखनऊमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. चोख पोलीस बंदोबस्त या कार्यक्रमासाठी ठेवण्यात आला आहे.

07:43 November 22

Big Breaking Live Page - वाचा आत्तापर्यंतच्या ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

मुंबई -  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यातील वाद वाढत चालला आहे. दोघांनीही  अनेक पत्रकार परिषदा घेऊन आक्रमक शैलीत एकमेंकाना प्रत्युत्तर दिलं आहे. तर नवाब मलिक टि्वट करून वानखेडेवर निशाणा साधत आहेत. आज नवाब मलिका यांनी पुन्हा एक टि्वट केले आहे. समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो नवाब मलिक यांनी ट्वीट केला. तसेच  'कबूल है, कबूल है, कबूल है...यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ?' असा प्रश्न केला आहे. आता यावर  वानखेडे हे काय म्हणतात हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.

Last Updated : Nov 22, 2021, 9:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.