ETV Bharat / city

Breaking News : राज्यातील 139 नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची सोडत जाहीर

author img

By

Published : Jan 27, 2022, 12:43 PM IST

Updated : Jan 27, 2022, 8:00 PM IST

http://10.10.50.85//maharashtra/27-January-2022/mh-mum-8death-7205149_27012022115306_2701f_1643264586_925.jpg
http://10.10.50.85//maharashtra/27-January-2022/mh-mum-8death-7205149_27012022115306_2701f_1643264586_925.jpg

20:00 January 27

Breaking News : रुग्णाच्या नातवाईकाची डॉक्टरसह स्टाफला मारहाण

नागपूर - कुणाल हॉस्पिटलमध्ये आज सकाळी आठ ते दहा लोकांनी त्यांच्या एका मित्राच्या मृत्यूनंतर तोडफोड केली. यावेळी या जमावाने डॉक्टर आणि रुग्णालयातील इतर स्टाफला मारहाण केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मानकापूर परिसरात कुणाल हॉस्पिटलमध्ये राहुल ईवनाते नावाच्या 28 वर्षीय तरुणाला अत्यवस्थ अवस्थेत आणले होते. काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी तोडफोड करत डॉक्टरसह स्टाफला मारहाण केली.

19:56 January 27

Breaking News : राज्यातील 139 नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची सोडत जाहीर

मुंबई - राज्यातील एकून 139 नगर पंचायतीच्या नगराध्यपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. यात एसटी -17 महिला -9, सर्व साधारण -8, मागासवर्गीय - 13, खुला 109 इत्यादी आरक्षणाचा समावेश आहे.

19:20 January 27

Breaking News : परमबीर सिंग यांना एसीबीचे समन्स, 2 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

मुंबई - शहराचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना एसीबीने समन्स बजावले आहेत. परमबीर यांनी 2 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश या समन्सनुसार बजावण्यात आले आहेत.

18:01 January 27

मुंबईत धावणार 900 डबल डेकर बस - आदित्य ठाकरे

मुंबई - शहरात 900 डबल डेकर बेस्ट धावणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. या बस इलेक्ट्रीकवर चालणाऱ्या असल्याचे त्यांनी सांगितले.

17:50 January 27

Breaking News : काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण

मुंबई - काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

17:45 January 27

Breaking News : ठाण्यात महिलेची सुरक्षा रक्षकाला मारहाण

ठाणे - एका महिलेने सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. या महिलेने नागरिकांना शिवीगाळ करत राडा केला आहे. दरम्यान ही महिला माणसिक तणावात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

17:29 January 27

Breaking News : किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन - नवाब मलिक

मुंबई - किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय झाल्याचेही ते म्हणाले.

17:10 January 27

Breaking News : कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीवर आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल

मुंबई - कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीवर आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यात 55 खंडणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने दिली आहे.

16:40 January 27

Breaking News : आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावर भीषण अपघात, भाजप पदाधिकारी ठार

गडचिरोली - आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावर कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात भाजपचे मन की बात कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक आनंद गण्यारपवार यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावर चार्मोशीजवळ घडली. त्यांच्यासह आणखी एक पदाधिकारी या अपघातात जखमी झाला आहे.

16:17 January 27

Breaking News : संभाजी भिडेविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

सांगली - संभाजी भिडे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. भिडे यांच्यासह काही धारकऱ्यांवरही अटक वॉरंट निघाले आहे.

16:10 January 27

Breaking News : समीर वानखेडे, क्रांती रेडकर यांच्या याचिकेवरील निकाल राखीव

मुंबई - समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी दिंडोशी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. वानखेडे कुटुंबीयांवर सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट करण्याबाबत ही याचिका होती. मात्र न्यायालयाने या याचिकेवरील निकाल राखीव ठेवला आहे.

15:53 January 27

Breaking News : अजित पवारांच्या मुलाचे कारनामे उघड करणार - किरीट सोमय्या

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाचे कारनामे उघड करणार आहे. त्यामुळे जय पवार लवकरच कारागृहात जाणार असल्याचा इशारा भाजपनेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

15:39 January 27

Breaking News : मालाडच्या मैदानाला टीपू सुलतान नाव महापालिकेने दिलेले नाही - महापौर

मुंबई - मालाडच्या मैदानाला टीपू सुलतान नाव पालिकेने दिलेले नसल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. ही जागा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अख्त्यारित येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेने उद्यानाला जे नाव दिलेच नाही, त्यावरून वाद कशाला असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मुंबईला अस्थिर आणि अशांत करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

15:14 January 27

Breaking News : जोगेश्वरीमधील इमारतीला आग, घटनास्थळी बचावकार्य सुरू

मुंबई - जोगेश्वरी येथील इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. सहाव्या मजवल्यावर आग लागल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण येत आहे.

14:48 January 27

Breaking News : वाहन न मिळाल्याने दुचाकीवरुन नेला मुलाचा मृतदेह

पालघर - वाहन न मिळाल्यामुळे दुचाकीवरुन मुलाचा मृतदेह नेल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. ही घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे.

14:41 January 27

Breaking News : दंगलखोर लोकं दंगलीचीच भाषा बोलणार, नाना पटोलेंचा टोला

मुंबई - दंगलखोर लोकं दंगलीचीच भाषा बोलणार असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला लगावला. त्या मैदानाचे नाव अगोदरपासूनच टीपू सुलतान असल्याचेही पटोले यावेळी म्हणाले. आज काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडली, त्यानंतर नाना पटोले हे माध्यमांशी बोलत होते.

14:33 January 27

Breaking News : कोणत्या कायद्याच्या आधारे मला नोटीस पाठवली, सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

मुंबई - मंत्रालयात फाईल पाहिल्यामुळे किरीट सोमय्या यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यावर किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कोणत्या कायद्यानुसार अटक केली, ते सांगावे असे आव्हानच दिले आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यालयात चौकशी मी, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातही मी पाहणी करून आल्याचेही सोमय्या यावेळी म्हणाले.

14:21 January 27

हिंमत असेल तर गुन्हा दाखल करा सोमैया यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

उद्धव ठाकरे खोटे बोलले आहेत ती चोरी पकडल्याचा राग

बाळासाहेब ठाकरे कुठे आणि हे मुख्यमंत्री कुठे

कोणत्या कायदा आधारे मला नोटीस पाठवली कायदा दाखवा सोमैया यांचे आव्हान

ठाकरे यांनी आपल्या कार्यालयात चौकशी करावी सरनाईक यांना कशी फायदे दिले याची माहिती घ्यावी

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातही मी पाहणी करून आलो आहे

19 जानेवारीला फाईल पाहून आलो आहे

महापालिका मधूनही फाईल पाहून आलो आहे

सचिन वाजेच्या फाईलचे निरीक्षण केले

किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषदेत माहिती

14:15 January 27

Breaking News : उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या 27 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई - मालेगाव येथील काँग्रेसच्या 27 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती हा प्रवेश सोहळा आज मुंबईत पार पडला आहे.

14:10 January 27

Breaking News : लता मंगेशकरांच्या प्रकृतीत सुधारणा, डॉक्टर म्हणाले . . .

मुंबई - सुप्रसिद्ध गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. आज लता दिदीने सुधारणा होत असल्याचे सूचित केले आहे. मात्र त्यांना आयसीयुमध्ये निगराणीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहितीही डॉक्टरांनी यावेळी दिली.

13:58 January 27

Breaking News : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ दुसऱ्यांदा कोरोनाबाधित

पुणे - शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ हे दुसऱ्यांदा कोरोनाबाधित झाले आहेत. त्रास जाणवल्यानंतर त्यांनी आपली कोरोना चाचणी करुन घेतली होती. या चाचणीत ते कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

13:00 January 27

Breaking News : गोव्यात पुन्हा भाजप सत्ता स्थापन करणार - प्रमोद सावंत

पणजी - गोव्यात भाजप पुन्हा सत्ता स्थापन करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला, त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी सावंत म्हणाले, की मी परंपरागत मतदार संघातून पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मी मोठ्य़ा फरकाने निवडून येणार आहे. त्यासह पुन्हा भाजप गोव्यात सरकार स्थापन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

12:44 January 27

Breaking News : नितेश राणेंना न्यायालयाचा झटका, शरण येण्यास दिला दहा दिवसांचा कालावधी

Nitesh Rane
नितेश राणे

मुंबई - शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. त्यांना शरण येण्यास दहा दिवसांचा कालावधी न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

11:43 January 27

Kamla building Update : कमला बिल्डींग प्रकरणात 8 मृत्यू 6 जणांची प्रकृती गंभीर

Big breaking news live page 27 Jan 2022
कमला बिल्डींग प्रकरण

मुंबई - गवालिया टॅंक, नाना चौक येथील सचिनम हाईट्स (कमला) या इमारतीला २२ जानेवारीला आग लागली. या आगीत २९ जण जखमी झाले. या जखमींपैकी ७ जणांचा मृत्यू झाला होता. कस्तुरबा रुग्णालयात दाखल प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांचा मध्यरात्री मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ८ वर पोहचला आहे. या घटनेतील ६ जणांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे.

Last Updated : Jan 27, 2022, 8:00 PM IST

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.