ETV Bharat / city

Lalbagh theft case सावधान! लालबागमध्ये गणेश भक्तांच्या गर्दीचा चोरट्यांनी घेतला फायदा, 46 तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल

author img

By

Published : Sep 8, 2022, 10:08 PM IST

लालबाग, परळ, गिरगाव या परिसरात गणेशोत्सवादरम्यान भाविकांची (Ganesha devotees) प्रचंड गर्दी होत असते. साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात यंदा मोठ्या संख्येने लालबाग परिसरात भाविकांनी हजेरी लावली होती. लालबागचा राजा, (lalbagh raja) मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, अशा अनेक गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी (Darshan of Ganapati Bappa) भाविक दरवर्षी गर्दी करतात. यंदा याच गर्दीचा फायदा घेऊन काही समाजकंटक आणि चोरट्यांनी भाविकांचा खिसा आणि मोबाईलवर डल्ला मारल्याचे दिसून येत आहे. 46 तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. Thieves took advantage of crowd of Ganesha devotees

Lalbagh theft case
सावधान! लालबागमध्ये गणेश भक्तांच्या गर्दीचा चोरट्यांनी घेतला फायदा, 46 तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल

मुंबई लालबाग, परळ, गिरगाव या परिसरात गणेशोत्सवादरम्यान भाविकांची (Ganesha devotees) प्रचंड गर्दी होत असते. साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात यंदा मोठ्या संख्येने लालबाग परिसरात भाविकांनी हजेरी लावली होती. लालबागचा राजा, (lalbagh raja) मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, अशा अनेक गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी (Darshan of Ganapati Bappa) भाविक दरवर्षी गर्दी करतात. यंदा याच गर्दीचा फायदा घेऊन काही समाजकंटक आणि चोरट्यांनी भाविकांचा खिसा आणि मोबाईलवर डल्ला मारल्याचे दिसून येत आहे. 46 तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. Thieves took advantage of crowd of Ganesha devotees

पोलिसांचं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन उद्या अनंत चतुर्दशी निमित्त लालबाग परिसरात कडेकोट बंदोबस्त मुंबई पोलिसांनी ठेवलेला असून काळाचौकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गुंड यांनी अनंत चतुर्दशी दिवशी लालबागमध्ये येणाऱ्या भाविकांना कळकळीचे आवाहन केले आहे की, त्यांनी आपली पर्स मोबाईल आणि मौल्यवान वस्तू यांची काळजी घेत गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सामील व्हावे. तसेच गर्दीत चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी त्यांनी आपापली काळजी घ्यावी. असे ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

46 तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल 6 सप्टेंबर रोजी लालबाग परिसरात संशयास्पद रित्या हालचाल करत असलेल्या दोन झारखंडच्या चोरट्यांना काळाचौकी पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. शुभम सुखदेव नोनीया या 19 वर्षीय आणि शेख अश्मद शेख जाकवा 19 वर्षीय अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडे एक मोबाईल सापडला आहे. 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत लालबाग परिसरातून एकूण चार मोबाईल चोरीस गेले असून एक पर्स चोरीस गेली असल्याची तक्रार प्राप्त झाले आहे. तसेच पैसे चोरीची एक घटना आणि मोबाईल गहाळ झाल्याच्या 40 घटना घडल्याची माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गुंड यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.