ETV Bharat / city

BEST Workers Protest : बेस्ट कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून ठिय्या आंदोलन

author img

By

Published : Mar 2, 2022, 9:35 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Strike) गेले काही महिने संप सुरू आहे. या संपावर तोडगा निघाला नसतानाच बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेत विलनीकरण करावा यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या सोमवारपासून बेस्ट कर्मचारी (BEST Workers Protest) ठिय्या आंदोलन करणार आहेत.

BEST
बेस्ट कर्मचारी ठिय्या आंदोलन

मुंबई - राज्यभर एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Strike) गेले काही महिने संप सुरू आहे. या संपावर तोडगा निघाला नसतानाच बेस्टचा अर्थसंंकल्प पालिकेत (BMC Budget) विलनीकरण करावा यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या सोमवारपासून बेस्ट उपक्रमाच्या प्रत्येक बस आगाराच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन (BEST Workers Protest) करण्यात येईल असा इशारा बेस्ट संयुक्त कृती समितीचे नेते शशांक राव यांनी दिला आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप -

बेस्ट संयुक्त कृती समितीकडून आज वडाळा डेपो येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी राव बोलत होते. यावेळी बोलताना, बेस्ट उपक्रमाच्या मालकीच्या ३,३३७ बसेस कायम ताफ्यात असतील, असा करार २०१९ मध्ये करण्यात आला होता. परंतु सध्या बेस्ट उपक्रमाच्या फक्त १,८०० बसेस असून खाजगी बसेस वाढल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. बेस्ट उपक्रम ही कोणा एका पक्षाची नसून कर्मचारी व मुंबईकरांची आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या आंदोलनात कर्मचाऱ्यांचे कुटुंब व मुंबईकरांचा सहभाग मिळावा यासाठी सोमवारपासून बस आगाराबाहेर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राव यांनी दिला आहे. सोमवारपासून व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असेही ते म्हणाले.

सोमवारपासून ठिय्या आंदोलन -

बेस्ट उपक्रमाचे खाजगीकरण करु नये, बेस्टच्या मालकीच्या ३,३३७ बसेस कायम ताफ्यात असणे, बेस्टचा उपक्रमाचा अर्थसंंकल्प पालिकेत विलनीकरण अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून बेस्ट उपक्रमाच्या प्रत्येक बस आगाराच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. विशेष म्हणजे या आंदोलनात मुंबईकर व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा सहभाग असेल, असे शशांक राव यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.