ETV Bharat / city

रेडीरेकनरवर लवकरच निर्णय घेतला जाईल - बाळासाहेब थोरात

author img

By

Published : Feb 5, 2020, 5:19 PM IST

Updated : Feb 5, 2020, 5:38 PM IST

राज्यात रेडीरेकनरच्या दराबद्दल जनतेसोबतच बांधकाम व्यावसायिकाना काहीसा दिलास देणारा निर्णय घेतला जाणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. या बाबत प्रक्रिया सुरू असल्याचे ते म्हणाले.

balasaheb-thorat-said-a-decision-will-be-taken-soon-radirunner-rate
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई - राज्यात रेडीरेकनरच्या दरा बद्दल जनतेसोबतच बांधकाम व्यावसायिकाना काहीसा दिलासा मिळावा, यासाठी सरकारकडून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. याबाबत प्रक्रिया सध्या सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

राज्यात रेडीरेकनरमध्ये काही बदल करण्यासाठी एक प्रक्रिया असते. राज्यातील बांधाकम व्यावसायिक आणि नागरीकांकडून मागणी केल्यास त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याधिकारी बैठका घेत असतात. सध्या या बैठका सुरू आहेत. यासाठी सरकारकडे अनेक निवेदन आलेली आहेत. त्यामुळे या सर्वांचा अभ्यास सुरू असून सरकारकडून त्यावर निर्णय घेतला जाईल असेही मंत्री थोरात यांनी स्पष्ट केले.

हिंगणघाटच्या घटनेसंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, हिंगणघाटची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये असे वाटते आणि त्यासाठीची काळजी घेणेही आवश्यक आहे. यामुळे आम्ही सरकार म्हणून कशा पद्धतीने पुढे जायचे त्यासाठी आजच मंत्रिमंडळ चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीएए संदर्भात महाविकास आघाडीची बैठक होणार असून त्यात आम्ही आमची सरकार म्हणून भूमिका स्पष्ट करणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

Intro:nullBody:रेडीरेकनरवर लवकरच निर्णय घेतला जाईल - बाळासाहेब थोरात
mh-mum-01-balasahebthorat-byte-7201153

यासाठीचा बाईट ३ जी लाईव्हवरून पाठविण्यात आला आहे

मुंबई, ता ५ :
राज्यात रेडीरेकनरच्या जनतेसोबतच बांधकाम व्यावसायिक यांना काहीसा दिलासा मिळावा यासाठी सरकारकडून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासोबत थोरात यांनी दिली.
राज्यात रेडीरेकनर काही बदल करण्यासाठी एक प्रक्रिया असते. राज्यातील बांधकाम व्यावसायिक आणि नागरीकांकडून मागणी केल्यास त्यासाठी हा रेडीरेकनर आवश्यक असल्यास वाढवणे किंवा कमी करणे यासाठीच आहे का, यासाठी अभ्यास असतो. त्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी बैठका घेत असतात. आणि या बैठका सुरू आहेत. यासाठी सरकारकडे अनेक निवेदन आलेले आहेत. त्यामुळे या सर्वांचा अभ्यास सुरू असून सरकारकडून त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.
हिंगणघाटच्या घटनेसंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, हिंगणघाटची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये असे वाटते. आणि त्यासाठीची काळजी घेणेही आवश्यक आहे. यामुळे आम्ही सरकार म्हणून कशा पद्धतीने पुढे जायचं त्यासाठी आजच्या मंत्रिमंडळ आम्ही चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सीएएसंदर्भात महाविकास आघाडीची बैठक होणार असून त्यात आम्ही आमची सरकार म्हणून भूमिका स्पष्ट करणार आहोत असेही त्यांनी सांगितले.Conclusion:null
Last Updated : Feb 5, 2020, 5:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.