ETV Bharat / city

कचरा व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीसाठी मुंबई महापालिकेला पुरस्कार

author img

By

Published : Nov 20, 2021, 10:51 PM IST

केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धा आयोजित (Central Government organized Swachh Survey 2021 competition) करण्यात आली होती. या मध्ये, चाळीस लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांच्या श्रेणीत, घनकचरा व्यवस्थापनातील 'नाविन्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी' साठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार बृहन्मुंबई महानगर पालिकेला( Award to Mumbai Municipal Corporation)प्रदान करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेला पुरस्कार
मुंबई महापालिकेला पुरस्कार

मुंबई - केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धा आयोजित (Central Government organized Swachh Survey 2021 competition) करण्यात आली होती. या मध्ये, चाळीस लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांच्या श्रेणीत, घनकचरा व्यवस्थापनातील 'नाविन्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी' साठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार बृहन्मुंबई महानगर पालिकेला( Award to Mumbai Municipal Corporation)प्रदान करण्यात आला आहे.

पालिकेला पुरस्कार -

नवी दिल्ली मध्ये विज्ञान भवन येथे आज (दिनांक २० नोव्हेंबर २०२१) झालेल्या समारंभात, गृहनिर्माण आणि नगर विकास खात्याचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी हा पुरस्कार प्रदान केला. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संगीता हसनाळे, उपायुक्त (परिमंडळ ७) भाग्यश्री कापसे, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) अशोक यमगर, कार्यकारी अभियंता (स्वच्छ भारत अभियान) अनघा पडियार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी घनकचरा व्यवस्थापन खात्याचे अभिनंदन केले आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने गृहनिर्माण आणि नगर विकास खात्याकडून दर वर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदा सन २०२१ च्या स्पर्धेत, ४० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या मोठ्या शहरांच्या श्रेणीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपले वर्चस्व पुन्हा दाखवून दिले.

पालिकेचे कचरा व्यवस्थापन -

सुमारे ४७५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या बृहन्मुंबई महानगरात दीड कोटीहून अधिक लोकसंख्या वास्तव्यास आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळपास दोन हजार किलोमीटर लांबीचे रस्ते समाविष्ट आहेत. त्यासोबत मुंबई महानगराला लागून असलेल्या इतर शहरांमधून दररोज नोकरी-व्यवसाय निमित्ताने कोट्यवधी नागरिक ये-जा करतात. ही सर्व व्याप्ती लक्षात घेतली तर दैनंदिन घनकचरा व्यवस्थापन करण्याचे अवाढव्य लक्ष्य महानगरपालिका प्रशासनासमोर असते. वार्षिक सरासरी सुमारे ६ हजार १०० मेट्रिक टन घनकचऱ्याचे व्यवस्थापन मुंबईत केले जाते(Mumbai Municipal Corporation's waste management) हे व्यवस्थापन अधिकाधिक सुलभ आणि पर्यावरणस्नेही व्हावे म्हणून महानगरपालिकेने अनेक पावले उचलली आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून लोकसहभाग देखील वाढवला आहे. या सर्व कामगिरीची दखल घेऊन महानगरपालिकेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

हेही वाचा - Iffi 2021 : 52 व्या ईफ्फी महोत्सवाचे शानदार उद्घाटन, हेमा मालिनींचा गौरव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.