ETV Bharat / city

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ स्वच्छ सर्वेक्षणाचे ब्रँड अ‌ॅम्बेसिडर

author img

By

Published : Aug 20, 2019, 8:10 PM IST

स्वच्छ भारत मिशनला भक्कम करण्यासाठी आणि जनसामान्यांत स्वच्छतेबाबत जागृती घडवून आणण्यासाठी अशोक सराफ यांना स्वच्छ सर्वेक्षणाचे ब्रँड अ‌ॅम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

बबनराव लोणीकर आणि अशोक सराफ

मुंबई - आपल्या कसदार अभिनयाने रसिकांची मने जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आता महाराष्ट्रातल्या जनतेला शौचालयाचे महत्व पटवून देणार आहेत. महाराष्ट्र राज्य स्वच्छ सर्वेक्षणाचे ब्रँड अ‌ॅम्बेसिडर म्हणून जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नावाची घोषणा आज स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी पत्रकार परिषदेत केली . यावेळी अभिनेत्री निर्मिती सावंत देखील उपस्तिथ होत्या .

बबनराव लोणीकरांची प्रतिक्रिया

स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून 2 ऑक्टोंबर 2019 पर्यंत स्वच्छ भारताचे लक्ष निर्धारीत करण्यात आले आहे. यासाठी स्वच्छ सर्वेक्षण - 2018 आणि शाश्वत स्वच्छता आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, या अहवालात स्वच्छेतेच्या संदर्भातील अनेक समस्या समोर आल्या आहेत. यानंतर शाश्वत स्वच्छतेसाठी समाज प्रबोधन एक प्रभावी माध्यम असू शकते अशी चर्चा वारंवार केली जात होती. दरम्यान, अशोक सराफ आणि निर्मीती सावंत या सिने कलाकारांवर ही जवाबदारी आता देण्यात आली.


मागील 5 वर्षांत राज्य सरकारने राज्याभरात ७० लाख शौचालये बांधली आहेत. मात्र, अनेक ठिकाणी शौचालयांचा वापर केला जात नाही. त्यामुळे स्वच्छ भारत मोहिमेला तडा जात असून जनसामान्यांत स्वच्छतेबाबत जागृती व्हावी. या दृष्टीने काम करत असल्याचे अभिनेते सराफ यांनी यावेळी सांगितले. स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांनी अभिनय केलेल्या लोककलेच्या ध्वनी चित्रफिती तयार करण्यात आल्या असून सात हजार गावात या ध्वनी चित्रफिती दाखवण्यात येणार असल्याची माहिती आहे.


स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्र सरकराकडून अनेक प्रयत्न केले गेले. सकाळी उघड्यावर शौचालयास बसणाऱ्यांच्या विरोधात अनेक मोहीम राबवल्या गेल्या. गुड मॉर्निंग पथक, वासुदेव आणि पोलिसांची कारवाई देखील करण्यात आली. मात्र काही लोकांची मानसिकता बदलली नाही. यामुळे आता महाराष्ट्रातील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याचे माहिती स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.

Intro:जेष्ठ अभिनेते अशोक सराफ स्वच्छता सर्वेक्षणाचे ब्रँड अँबॅसेडर

मुंबई २०

आपल्या कसदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारे जेष्ठ अभिनेते अशोक सराफ आता महाराष्ट्रातल्या जनतेला शौचालयाचे महत्व पटवून देणार आहेत . महाराष्ट्र राज्य स्वच्छ सर्वेक्षणाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नावाची घोषणा आज स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी पत्रकार परिषदेत केली . यावेळी अभिनेत्री निर्मिती सावंत देखील उपस्तिथ होत्या .

राज्य सरकारने राज्यात ७० लाख शौचालये बांधली आहेत . मात्र अनेक शौचालयांचा वापर होत नाही . त्यामुळे स्वच्छ भारत मोहिमेला तडा जात असून जनसामन्यात स्वच्छतेबाबाबत प्रबोधन व्हावे या दृष्टीने काम करत असल्याचे अभिनेते सराफ यांनी सांगितले . स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांनी अभिनय केलेल्या लोककलेच्या ध्वनी चित्रफिती तयार करण्यात आल्या असून सात हजार गावात या ध्वनी चित्रफिती दाखवण्यात येणार आहेत .
स्वच्छ अभियानांतर्गत महाराष्ट्र सरकराकडून अनेक प्रयत्न केले गेले . सकाळी बाहेर शौचालयास बसणाऱ्यांच्या विरोधात अनेक मोहीम राबवल्या गेल्या . गुड मॉर्निंग पथक , वासुदेव आणि पोलिसांची कारवाई ही केली गेली . मात्र काही लोकांची मानसिकता बदलली नाही . आता महाराष्ट्रात लोकप्रिय असणाऱ्रे जेष्ठ अभिनेते अधिक सराफ यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याचे स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले .Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.