ETV Bharat / city

BMC Election : ओबीसी आरक्षणामुळे पुन्हा नव्याने लॉटरी, वंचितांना मिळणार पुन्हा एकदा संधी

author img

By

Published : Jul 21, 2022, 4:11 PM IST

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ( BMC Election ) राज्य सरकारने प्रभागांच्या संख्येत ९ ने वाढ केल्याने मुंबई महापालिकेतील प्रभागांची संख्या २३६ झाली. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याने ते प्रभाग खुले करत इतर आरक्षण लॉटरी काढण्यात आली. त्यानुसार प्रभाग रचना करून अनुसूचित जाती, ( Scheduled caste ) अनुसूचित जमाती, महिला आरक्षण लॉटरी काढण्यात आली.

BMC Election
मुंबई महानगरपालिका निवडणुक

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ( BMC Election ) आरक्षण लॉटरी काढण्यात आली आहे. लॉटरीमुळे अनेकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांना निवडणुक लढवण्यापासून वंचित रहावे लागले आहे. मात्र आता सुप्रीम कोर्टाने ( Supreme Court ) ओबीसी आरक्षणाला ( OBC reservation ) मान्यता दिल्याने पुन्हा नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यामुळे निवडणुकीपासून वंचीत झालेल्यांना पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी मिळण्याची शक्यता असल्याने सर्वांचे लक्ष नव्याने निघणाऱ्या लॉटरीकडे लागले आहे.


आरक्षण लॉटरी - मुंबई महापालिकेची निवडणूक ( BMC Election ) फेब्रुवारी मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर पडली. पालिकेच्या २२७ प्रभागांसाठी निवडणूक होणार होती. राज्य सरकारने प्रभागांच्या संख्येत ९ ने वाढ केल्याने मुंबई महापालिकेतील प्रभागांची संख्या २३६ झाली. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याने ते प्रभाग खुले करत इतर आरक्षण लॉटरी काढण्यात आली. त्यानुसार प्रभाग रचना करून अनुसूचित जाती, ( Scheduled caste ) अनुसूचित जमाती, महिला आरक्षण लॉटरी काढण्यात आली.


असे झाले प्रभाग आरक्षित - २३६ प्रभागांपैकी १५ प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आले. त्यामधील ८ प्रभाग अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. अनुसूचित जमातीसाठी २ प्रभाग आरक्षित करण्यात आले. त्यापैकी १ प्रभाग अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला. एकूण २३६ पैकी ५० टक्के म्हणजेच ११८ प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. अनेकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने अनेकांना निवडणूक लढवण्यापासून वंचित राहावे लागले आहे तर काहींना बाजूच्या प्रभागांमधून निवडणूक लढवण्याची संधी मिळावी यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मनधरणी करावी लागत आहे.

हेही वाचा - Sonia Gandhi ED inquiry : सोनिया गांधींच्या ईडी चौकशीवरून संसदेत गदारोळ, कायद्यापुढे सर्व सारखे आहेत की नाही? केंद्रीय मंत्र्याचा सवाल

पुन्हा आरक्षण लॉटरी - ओबीसींना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने ( State Govt ) नियुक्त केलेल्या बांटिया आयोगाचा अहवाल ( Report Banthia Commission ) स्वीकारला आहे. सुप्रीम कोर्टाने या अहवालानुसार ओबीसींना आरक्षण दिल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. यामुळे पालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षणासह होणार हे स्पष्ट झाले आहे. मुंबई महापालिकेने याआधी ओबीसी आरक्षण वगळून लॉटरी काढली होती. आता पालिकेला पुन्हा ओबीसी आरक्षणासह लॉटरी काढावी लागणार आहे.


अशी निघणार लॉटरी - २३६ प्रभागांमध्ये १५ प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव ( Reserved Wards for Scheduled Castes ) आहेत. ते प्रभाग तसेच राहतील त्यामधून अनुसूचित जातीच्या महिलांसाठी ८ प्रभागांसाठी लॉटरी काढली जाईल. त्यानंतर अनुसूचित जमातीच्या २ प्रभागांपैकी महिलांसाठी १ प्रभागासाठी लॉटरी काढली जाईल. ओबीसीसाठी आरक्षित ६१ प्रभाग कोणते याची लॉटरी निघेल त्यामधून महिलांसाठी ३१ प्रभागांसाठी लॉटरी काढली जाईल. त्यानंतर उर्वरित १५८ प्रभागांमधून महिला आरक्षणाची लॉटरी काढली जाणार आहे. २००७, २०१२, २०१७ मधील निवडणुकीत जे प्रभाग ज्या जाती किंवा महिलांसाठी आरक्षित केले गेले असतील ते पुन्हा त्याचसाठी आरक्षित केले जाणार नाहीत. त्यासाठी प्राधान्य क्रमांक १, २, ३ ठरवण्यात येणार आहेत. अशी, माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.


ओबीसी आरक्षित प्रभागांनाही प्राधान्य क्रम हवा - मुंबई महापालिकेकडून नुकत्याच काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये ओबीसी आरक्षित प्रभाग प्राधान्य क्रमांक १, २ आणि ३ यांची नोंद घेण्यात आली नव्हती. यामुळे माझा प्रभाग २०१२ मध्ये ओबीसी महिला आरक्षित होता आता तो महिला आरक्षित झाला आहे. या लॉटरीच्या पद्धतीवर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पुन्हा नव्याने लॉटरी काढताना प्राधान्य क्रमांक १, २ आणि ३ जाहीर करताना ओबीसी आरक्षित प्रभाग यांचीही दखल घेणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली आहे.


आरक्षणामुळे यांना फटका -भाजप - प्रभाकर शिंदे, अभिजित सामंत, विनोद मिश्रा, जगदीश ओझा, आकाश पुरोहित, नील सोमय्या, हरीश भडिंग दीपक ठाकूर, हर्ष पटेल, संदीप पटेल, मकरंद नार्वेकर, अतुल शाह, पंकज यादव, शिवकुमार झा, बाळा तावडे.

काँग्रेस - रवी राजा, अश्रफ आझमी, आसिफ झकेरिया, वीरेंद्र चौधरी, सुफियान वणू, कमरजहा सिद्दीकी.

शिवसेना - यशवंत जाधव, राजूल पटेल, विठ्ठल लोकरे, संजय घाडी, चंद्रशेखर वायंगणकर, विश्वनाथ महाडेश्वर, राजू पेडणेकर, मंगेश सातमकर, उपेंद्र सावंत, उमेश माने, परमेश्वर कदम, अमेय घोले, आशिष चेंबूरकर, सदानंद परब, स्वप्नील टेंम्बवलकर.


हेही वाचा - Breaking Metro Carshed Project in Aarey : महाविकास आघाडीला धक्का, आरेमधील कारशेडवरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठविली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.