ETV Bharat / city

Arvind Sawant Tweet : सरन्यायाधीश रमणा नाही तर आम्हाला न्याय कोण देणार - खासदार अरविंद सावंत

author img

By

Published : Aug 7, 2022, 12:07 PM IST

Updated : Aug 7, 2022, 12:48 PM IST

२६ ऑगस्ट 2022 रोजी सरन्यायाधीश रमणा सेवानिवृत्त होत आहेत. शिवसेनेने यावरून चिंता व्यक्त केली आहे. कारण शिंदे गटाच्या वकिलांना ( Supreme Court ) सरन्यायाधीश रामण्णा यांनी कोंडीत पकडल्याने शिंदे गटाची चिंता वाढली होती. तरी त्यावर अजून सुनावणी चालूच आहे. आता ८ ऑगस्टला होणारी सुनावणी लांबली असून, ती 12 ऑगस्टला होणार आहे. परंतु, सर न्यायाधीश रमाण्णा ( Supreme Court, Chief Justice N. V. Ramana ) हे लवकरच २६ ऑगस्टला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढल्याने, याची खंत अरविंद सावंत यांनी ट्विटद्वारे व्यक्त केली.

Shiv Sena MP Arvind Sawan
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत

मुंबई : शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) सुनावणी सुरू आहे. न्यायालयाकडून सुनावणीवर तारीख पे तारीख दिली जात आहे. त्यातच सरन्यायाधीश रामण्णा सेवानिवृत्त होत आहेत. शिवसेनेचे यामुळे टेन्शन वाढले असून, आम्हाला न्याय कोण देणार, अशी खंत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील अनेक निर्णयांवर त्यांंनी योग्य निर्णय दिल्याने, शिवसेनेला सरन्यायाधीश रमणा ( Supreme Court, Chief Justice N. V. Ramana ) यांचा खंडपीठावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर शिवसेनेची चिंता वाढली आहे. याचीच खंत अरविंद सावंत यांनी व्यक्त केली.




शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वाद एन. व्ही. रमाण्णा यांच्या खंडपीठापुढे : बंडखोर नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत राज्यात सरकार स्थापन केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने शिंदे यांच्यासहित 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असून, सरन्यायाधीश एन. व्ही. रमाण्णा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होत आहे.

शिवसेनेची चिंता वाढली : सरन्यायाधीश रमणा यांनी शिंदे गटाच्या वकिलांना पक्ष, संविधान आणि कायद्यातील कलमातून कात्रीत पकडले आहे. शिवाय, गोंधळलेल्या शिंदे गटाच्या वकिलांकडून लिखित म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. सलग दोन दिवस झालेल्या सुनावणीनंतर ८ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, सोमवारची ८ तारीखदेखील पुढे गेली असून, १२ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

सर न्यायाधीश रमाण्णा होणार 26 ऑगस्टला सेवानिवृत्त : २६ ऑगस्टला सरन्यायाधीश रमणा सेवानिवृत्त होत आहेत. शिवसेनेने यावरून चिंता व्यक्त केली आहे. कारण शिंदे गटाच्या वकिलांना सरन्यायाधीश रामण्णा यांनी कोंडीत पकडल्याने शिंदे गटाची चिंता वाढली होती. तरी त्यावर अजून सुनावणी चालूच आहे. आता ८ ऑगस्टला होणारी सुनावणी लांबली असून, ती 12 ऑगस्टला होणार आहे. परंतु, सर न्यायाधीश रमाण्णा हे लवकरच 26 २६ ऑगस्टला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे.

अरविंद सावंत यांनी व्यक्त केली खंत : शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादाची सुनावणी लांबली शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादाची सुनावणी दिवसेंदिवस वाढत आहे. घटनात्मक संकटाचा सामना करीत आहे आणि सरन्यायाधीश व्ही एन. व्ही. रमाण्णा सेवानिवृत्त होत आहेत. रमाण्णा नाही तर न्याय कोण देणार, अशी खंत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केली आहे.


कोण आहेत सर न्यायाधीश रमाण्णा : सरन्यायाधीश एन. व्ही. रमाण्णा यांचे पूर्ण नाव नथापलपती वेंकट रमण्णा असे आहे. त्यांचा जन्म २७ ऑगस्ट १९५७ रोजी आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील पोन्नवरम गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. १० फेब्रुवारी १९८३ रोजी त्यांनी वकील म्हणून या क्षेत्रात पहिले पाऊल टाकले होते. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणूनदेखील त्यांनी याआधी काम पाहिले आहे. आंध्र प्रदेशच्या न्याय अकादमी अध्यक्ष होते. न्यायमूर्ती रमाण्णा १० मार्च २०१३ पासून २० मे २०१३ पर्यंत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.

मुख्य न्यायाधीश 2013 साली नियुक्ती : त्यांची दिल्ली उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश म्हणून २०१३ साली नियुक्ती झाली. जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट सुविधा पुरविण्याचा त्यांचा निर्णय गेल्या काही वर्षांतील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चित निर्णयांपैकी राहिला निर्णय होता. कर्नाटक विधानसभा गोंधळ न्यायालयात पोहोचला तेव्हा रमण्णा यांनी काँग्रेसच्या राजीनामा दिलेल्या आमदारांना पुन्हा निवडणूक लढायला परवानगी दिली होती. याच खटल्यात विधानसभेच्या सभापतींनी आपली वागणूक त्रयस्थ ठेवली पाहिजे, पक्षाची बाजू घेता कामा नये, असे रमण्णा यांनी खडसावले होते. महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवरही त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. त्यामुळेच शिवसेनेला सरन्यायाधीश रमणा यांचा खंडपीठावर विश्वास आहे.

हेही वाचा : Suicide of Indian woman in New York : न्यूयाॅर्क शहरात भारतीय महिलेची आत्महत्या; मृत्यूपूर्वी छळाची व्हिडिओमधून दिली माहिती

Last Updated :Aug 7, 2022, 12:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.