ETV Bharat / city

Anil Deshmukh Case : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी संजीव पलांडेंनी दिली होती अनिल देशमुखांना यादी!

author img

By

Published : Nov 28, 2021, 9:30 PM IST

ईडीला ( Directorate of Enforcement ) दिलेल्या जबाबाचे हवाला देत मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. राज्यातील एक कॅबिनेट मंत्री, सहायक पोलीस आयुक्त किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या ( Transfers of Senior officers Case ) करण्यासाठी तसेच त्यांना तैनातीच्या उद्देशाने एक यादी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठवली, असल्याची कबुली संजीव पलांडे यांनी जबाबात दिली आहे, अशी माहिती ईडीने न्यायालयात दिली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख
माजी गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सचिव संजीव पलांडे ( Anil Deshmukh's Secretary Sanjeev Palande ) यांनी ईडीला ( Directorate of Enforcement ) दिलेल्या जबाबाचे हवाला देत मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. राज्यातील एक कॅबिनेट मंत्री, सहायक पोलीस आयुक्त किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या ( Transfers of Senior officers Case ) करण्यासाठी तसेच त्यांना तैनातीच्या उद्देशाने एक यादी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठवली, असल्याची कबुली संजीव पलांडे यांनी जबाबात दिली आहे, अशी माहिती ईडीने न्यायालयात दिली आहे.

काय आहे प्रकरण?

ईडीने न्यायालयासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले, की देशमुख यांच्या निर्देशांवरून संजीव पलांडे हे अनौपचारिक यादी पोलीस स्थापना मंडळाला पाठवत होते. संजीव पलांडे यांनी आपल्या विरोधातील मनी लाँड्रिंगचे प्रकरण रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान ईडीने शनिवारी (दि.27) रोजी प्रतिज्ञापत्र सादर केले असून ईडीने या याचिकेला विरोध केला आहे. ईडीने दावा केला की एक मंत्री या यादीसह तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांना भेटत होते. या यादीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या किंवा त्यांच्या तैनातीच्या ठिकाणांच्या नावांचा समावेश होता. या यादीत शिवसेनेच्या आमदारांचे आणि विधान परिषदेच्या सदस्यांची नावेही असत. प्रतिज्ञापत्रानुसार, संजीव पलांडे यांनी बार, ऑर्केस्ट्रॉ मालकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या पैशांमध्ये वाढ करण्याच्या शक्यतेवर चर्चा करण्यासाठी बर्खास्त पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि देशमुख यांच्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. संजीव पलांडे यांना याच वर्षी जूनमध्ये अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्या अटकेच्या तीन महिन्यांनंतर राज्य सरकारने त्यांना निलंबित केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात अटक करण्यात आले आहे. ते सुद्धा न्यायालयीन कोठडीत आहेत.

हेही वाचा - prasad lad criticize Sanjay Raut - संजय राऊत यांना छंद नसून चंदा लिहायचे असेल, कारण तोच त्यांचा धंदा - भाजप नेते प्रसाद लाड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.