ETV Bharat / city

Anil Deshmukh Case : सीबीआय कोर्टात अनिल देशमुख यांनी स्वत:चा केला युक्तीवाद; तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य केल्याचा दावा

author img

By

Published : Apr 6, 2022, 9:13 PM IST

Updated : Apr 6, 2022, 10:06 PM IST

अनिल देशमुख
अनिल देशमुख

सीबीआयचे वकील राम मोहन चांद ( CBI counsel Ram Mohan Chand ) यांनी म्हटले की राज्य सरकार आणि अनिल देशमुख हे सीबीआयला तपासात कुठलेही सहकार्य करत नाही. मी कुठल्याही केंद्रीय तपास यंत्रणेला सहकार्य केले ( CBI in the investigation ) नाही, असे माझ्याकडून कधीच घडलेले नाह. मी नेहमीच कोणतीही तपास यंत्रणा असो त्यांना गेल्या वर्षभरात मी सहकार्य केले आहे. मी स्वतः जेलमधून सीबीआयला पत्र लिहून आर्थर रोड जेलमध्ये येऊन माझी केव्हाही चौकशी करू शकतात ( Arthur Road Jail interrogation ), असे पत्र लिहिले आहे.

मुंबई - 100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयने आज अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळेस अनिल देशमुख यांनी सीबीआय वकिलांकडून करण्यात आलेल्या युक्तिवादाला स्वतः उत्तर दिले तसेच राजकीय शैलीत चौफेर फटकार बाजीदेखील केली आहे. मी मराठीत बोलणार नाही, कारण की सीबीआय अधिकाऱ्यांना मराठी कळत नाही, असे म्हणत अनिल देशमुख यांनी स्वतः युक्तिवाद ( Anil Deshmukh argument ) सुरू केला.



सीबीआयचे वकील राम मोहन चांद ( CBI counsel Ram Mohan Chand ) यांनी म्हटले की राज्य सरकार आणि अनिल देशमुख हे सीबीआयला तपासात कुठलेही सहकार्य करत नाही. मी कुठल्याही केंद्रीय तपास यंत्रणेला सहकार्य केले ( CBI in the investigation ) नाही, असे माझ्याकडून कधीच घडलेले नाही. मी नेहमीच कोणतीही तपास यंत्रणा असो त्यांना गेल्या वर्षभरात मी सहकार्य केले आहे. मी स्वतः जेलमधून सीबीआयला पत्र लिहून आर्थर रोड जेलमध्ये येऊन माझी केव्हाही चौकशी करू शकतात ( Arthur Road Jail interrogation ), असे पत्र लिहिले आहे.

अनिल देशमुख यांनी म्हटले की शुक्रवारी रात्री अर्थ रोडच्या बाथरूममध्ये रात्री गेलो असता मी चक्कर येऊन पडलो. माझ्या खांद्याला दुखापत देखील झाली. माझ्या खांद्यावर फिजियोथेरेपीच्या माध्यमातून उपचार सुरू आहे. खांद्याचे ऑपरेशन आवश्यक असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. खांदा थोडा बरा झाला की त्यावर ऑपरेशनदेखील होणार आहे.


सीबीआय अधिकारी यांनी मागील महिन्यात माझी आर्थर रोड जेलमध्ये येऊन चौकशी केली आहे. आठ-आठ तास मला एका खोलीत बसून तीन दिवस माझी चौकशी केली आहे. तरीदेखील सीबीआय अधिकारी म्हणतात की मी सहकार्य करत नाही. हा आरोप का? असा प्रश्न अनिल देशमुख यांनी न्यायालयासमोर सीबीआय अधिकाऱ्यांना विचारला आहे. तसेच अनिल देशमुख यांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याचे चौक उत्तर अनिल देशमुख यांनी त्यांच्या शैलीत न्यायालयासमोर सीबीआयला दिले. आजपर्यंत अनिल देशमुख यांनी त्यांच्यावर सुरू असलेल्या कुठल्याही खटल्यात स्वतः युक्तिवाद केला नव्हता. आज पहिल्यावेळी त्यांनी सीबीआयने अटक केल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात युक्तिवाद केला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचे एक वेगळे रूप पाहायला मिळाले आहे.



काय म्हणाले अनिल देशमुख?

  • मी मराठीत बोलणार नाही कारण सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ते कळणार नाही.
  • सीबीआयचा आरोप आहे, की मी सहकार्य केले नाही.
  • गेल्या वर्षभरात मी सर्व तपास यंत्रणांना सहकार्य केले आहे.
  • आर्थर रोडच्या बाथरूममध्ये गेल्या आठवड्यात मी चक्कर येऊन पडलो.
  • दोन वेळा जेजेतील डॉक्टर माझी तपासणी करून गेले.
  • माझ्यावर ऑपरेशन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
  • जेलमध्ये सलग तीन दिवस माझी चौकशी केली आहे.
  • आठ-आठ तास मला एका खोलीत बसून चौकशी झाली.
  • तरीही मी सहकार्य करत नाही असा का आरोप?
  • खांद्यावर फिजिओथेरपी सुरू आहे.
  • ते थोडे बरे झाले की त्यावर ऑपरेशन होणार आहे.
  • आजवर माझी चौकशी मुंबईतच झाली आहे.
  • सीबीआयला मी स्वतः जेलमधून पत्र लिहिले आहे.
  • जेलमध्ये येऊन कधीही माझी चौकशी करा, असे मी त्यांना सांगितले.

हेही वाचा-Girish Mahajan Reply Sanjay Raut : 'खोटे बोल पण नेटाने बोल', महाजनांची संजय राऊतांवर टीका

हेही वाचा-Keshav Upadhyay Press conference : जिल्हा परिषदेत एवढा मोठा भ्रष्टाचार झाला तरी पालकमंत्री गप्प का? - केशव उपाध्याय

हेही वाचा-Anil Deshmukh Remanded CBI Custody : अनिल देशमुख यांना 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी, चौकशीसाठी नेणार दिल्लीला

Last Updated :Apr 6, 2022, 10:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.