ETV Bharat / city

Keshav Upadhyay Press conference : जिल्हा परिषदेत एवढा मोठा भ्रष्टाचार झाला तरी पालकमंत्री गप्प का? - केशव उपाध्याय

author img

By

Published : Apr 6, 2022, 8:20 PM IST

केशव उपाध्याय
Keshav Upadhyay

कोल्हापुरात कोविड काळात जिल्हा परिषद आणि महापालिकेत खरेदी करण्यात आलेले मास्क, मृतदेह झाकण्यासाठी असलेली बॅग यासारख्या अनेक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार झाला असून, एकूण 88 कोटी रुपयाची बिले दिली गेली आहेत. यावर अंतर्गत ऑडिट झाल्यानंतर ही पालकमंत्री गप्प का? असा सवाल भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय ( BJP spokesperson Keshav Upadhyay ) यांनी केला आहे.

कोल्हापूर: गेल्या अडीच वर्षात कोल्हापूरचा विकास ठप्प झाला आहे. कोल्हापुरात कोणत्याच प्रकारच्या विकासाला चालना मिळाली नाही. पण मुंबई महापालिकेशी कोल्हापूरकर भ्रष्टाचाराच्या बाबतीत स्पर्धा करत असल्याचे, वक्तव्य भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी आज पत्रकार परिषदेत ( Press conference of Keshav Upadhyay ) केले. कोविड काळात जिल्हा परिषद आणि महापालिकेत खरेदी करण्यात आलेले मास्क, मृतदेह झाकण्यासाठी असलेली बॅग यासारख्या अनेक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार झाला असून, एकूण 88 कोटी रुपयाची बिले दिली गेली आहेत. यावर अंतर्गत ऑडिट झाल्यानंतर ही पालकमंत्री गप्प का? कोणाच्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, असा सवाल त्यांनी विचारला. तसेच चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचे प्रयत्न पालकमंत्री करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांची पत्रकार परिषद


पालकमंत्री कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत? - सध्या कोल्हापुरात उत्तर विधानसभेसाठी पोटनिवडणूक लागली आहे. त्यामुळे महविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी प्रमुख लढत येते पाहायला मिळत आहे. भाजपने प्रचारासाठी राज्यातील अनेक मोठ्या नेते मंडळींना कोल्हापुरात बोलावले आहे.तसेच रोज आरोप प्रत्यारोपांच्या फाईली झडू लागल्या आहेत. भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय ( BJP spokesperson Keshav Upadhyay ) यांनी आज पत्रकार परिषद घेत पालकमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. कोविड काळात जिल्हा परिषद आणि महापालिकेत कोरोडोचे घोटाळे झाले असून यावर पालकमंत्री गप्प का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

कोणाच्या मित्राला वाचवण्यासाठी प्रकरण दाबत आहेत? - तसेच जिल्हा परिषदेत कोरोना काळात मृतदेह झाकण्यासाठी मागवलेल्या बॅग, N95 मास्क, थर्मल स्कॅनर अश्या सर्व साहित्यांची खरेदी 88 कोटी मध्ये करण्यात आली आहे. मात्र हे सर्व साहित्य त्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनी कडून खरेदी न करता, अश्यांकडून खरेदी करण्यात आल्या आहेत की, त्या गोष्टींचा त्या कंपनीशी काहीच संबंध नाही. आणि या गोष्टीतून मोठा भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी आरोप केले आहेत. तसेच सरकारकडून अंतर्गतरित्या करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये हे समोर आले असताना ही, पालकमंत्री सतेज ( Guardian Minister Satej Patil ) पाटील गप्प का आहेत ( why Guardian Minister silent? ). ते कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत? कोणाच्या मित्राला वाचवण्यासाठी प्रकरण दाबत आहेत, हे सर्व कोणाचे मित्र आहेत यावर पालकमंत्री काय बोलणार आहेत का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

हेही वाचा -Swabhimani Shetkari Sanghatana : ठाकरे सरकारला मोठा झटका; स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर



ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.