ETV Bharat / city

Swabhimani Shetkari Sanghatana : ठाकरे सरकारला मोठा झटका; स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर

author img

By

Published : Apr 5, 2022, 7:26 PM IST

Updated : Apr 6, 2022, 4:31 PM IST

गेल्या अनेक दिवसांपासून महाविकासआघाडी सरकारवर नाराज असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना आज या सरकार मधूनबाहेर पडल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. कोल्हापुरात आज स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाची राज्य कार्यकारणी बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे. ( Swabhimani Shetkari Sanghatana party leave Maha Vikas Aghadi government ) , , , , , कोल्हापूर, , , राजू शेट्टींच्या भूमिकेकडे लक्ष

Swabhimani Shetkari Sanghatana
राजू शेट्टी

कोल्हापूर - गेल्या अनेक दिवसांपासून महाविकासआघाडी सरकारवर नाराज असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना आज या सरकार मधूनबाहेर पडल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ( Mahavikas Aaghadi govt leave raju shetty ) केली आहे. कोल्हापुरात आज स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाची राज्य कार्यकारणी बैठक पार ( Executive meeting of Swabhimani Shetkari Sanghatana ) पडली. या बैठकीत सकाळपासून राज्यभरातून आलेल्या कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी शेट्टी यांना आपण यापुढे एकला चलो रे ची भूमिका घ्यायला हवी असे म्हटले होते. तसेच सर्वच कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा असे आवाहन केले होते त्याप्रमाणे आज त्यांनी आपण आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. ( Swabhimani Shetkari Sanghatana party leave Maha Vikas Aghadi government )

राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया

एकटा अन्यायाविरोधात लढणार - गेल्या अनेक दिवसांपासून राजू शेट्टी सरकारवर नाराज होते. एकरकमी एफआरपीचा मुद्दा असो किंवा महापूर आणि चक्रीवादळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्याना मदत देण्यावरून अश्या अनेक मुद्द्यामुळे राजू शेट्टी नाराज होते. तर याबाबत राजू शेट्टी यांनी शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. मात्र आज राजू शेट्टी यांनी आज महाविकास आघाडीमधून बाहेर पडल्याची घोषणा केली आहे. तसेच पुढे ते भाजपमध्ये ही जाणार नसून एकटा या अन्यायाविरुद्ध लढणार असल्याचे म्हटले आहे.

राज्यपालांना विनंती करणार - राज्यपालांना भेटून गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत चर्चा करणार असून त्यातून माझे म्हणजे राजू शेट्टी यांचे नाव वगळावे अशी विनंतीही त्यांनी करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच यापुढे पूर्ण राज्य पुन्हा पिंजून काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

२२००० कोटी रूपयांना चुना लावणार्या कंपन्यांची चौकशी करावी - शेतकऱ्यांच्या पीक विम्यामध्ये तीन वर्षात २२ हजार कोटी रूपयांचा नफा मिळवला आहे. केंद्र सरकारनेही शेतकर्यांची फसवणूक केली आहे. ईडीच्या प्रमुखांना माझी विनंती आहे की, शेतकर्यांना २२००० कोटी रूपयांना चुना लावणार्या कंपन्यांची चौकशी करावी. मी कधीही पुरावे द्यायला कधीही तयार आहे. विम्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाड टाकावी. याची तपासणी का करत नाही.असा सवाल ही राजू शेट्टी यांनी विचारला आहे.

आमदार देवेंद्र भुयार यांच्या हकालपट्टीवर कार्यकारणीचा शिक्कामोर्तब - आमचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी केली. यावर आमचा आज शिक्कामोर्तब झाला. तसेच दिवसभर मी राज्यातील अनेक पदाधिकाऱ्यांची मते ऐकली. महाविकास आघाडी सोडल्यावर आपण काय करायचे यावर दोन दिवस आमची चर्चा झाली. 2004 पासून आम्ही शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून काम करत आहे. या चळवळीचे उद्दिष्ट आम्ही सध्या करण्यासाठी आपण निवडणुकीचा मार्ग स्वीकारला. ज्या काही आघाड्या केल्या जे काही निर्णय घेतले ते फक्त शेतकऱ्यांचे हित काय आहे. यासाठी आम्ही यांच्यासोबत आपण गेलो.

शरद पवार यांचीही आश्वासने विरघळून - महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तयार झाल्याचे सांगण्यात आले पण त्यांनीही शेतकऱ्यांच्या वाटोळे लावले. पवार साहेबांनी साताऱ्याच्या सभेत भर पावसात आम्ही या जनतेला न्याय देण्यासाठी आम्हाला निवडून देण्याचे आश्वासन दिले. पण त्यांनी पावसात जसे उन्हाने वाळलेले ढेकूण विरघळते तसेच त्यांची आश्वासने विरघळून गेली. महाविकास आघाडीच्या सरकारने किमान समान कार्यक्रम जाहीर केला त्यात शेतकरी हा केंद्रबिंदू ठेऊन त्यांनी जाहीरनामा तयार केला पण या सरकारने भूमिअधिग्रहण कायदा करून मागच्या सरकरपेक्षा मोठा भ्रमनिरास केला.

त्यांचे आमचे सगळे सबंध संपले - राजू शेट्टी : गतवर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले यावर या सरकारने तुटपुंजी मदत केली. शेतकऱ्यांना महापुरात झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी स्वाभिमानीने मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. पण या सरकारने १३५ रुपये मदत देऊन शेतकऱ्यांना फसवले. ज्या सरकारने आम्हाला फसवलं या सरकारला आम्ही का पाठिंबा द्यायचा असा सवाल शेट्टींनी उपस्थित केला. ते पूढे म्हणाले आम्ही भाजपच्याही माघारी लागलो न्हवतो यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला येण्याची विनंती केली होती. तर 2019 ला महाविकास आघाडीसोबत येण्यासाठी आम्हाला शरद पवारांनी विनंती केली होती. यामुळे आम्ही दलबदलु होत नाही. या दोघांनाही आम्हाला फसवलं आहे. आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहोत. त्यांचे आमचे सगळे सबंध संपले आहेत. हे मी राज्य कार्यकारिणी समोर जाहीर करतो असे शेट्टी म्हणाले.

हेही वाचा - Sanjay Raut Property Seize By ED : शिवसेना नेते संजय राऊतांविरोधात ईडीची मोठी कारवाई; ११.१५ कोटींची मालमत्ता जप्त

Last Updated : Apr 6, 2022, 4:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.