ETV Bharat / city

Sanjay Raut Property Seize By ED : शिवसेना नेते संजय राऊतांविरोधात ईडीची मोठी कारवाई; ११.१५ कोटींची मालमत्ता जप्त

author img

By

Published : Apr 5, 2022, 2:45 PM IST

Updated : Apr 5, 2022, 4:35 PM IST

शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात ईडीने (ED Action) मोठी कारवाई केली आहे. राऊत यांची ११.१५ कोटी रुपयांच्या मालमत्ता ईडीने जप्त केली (Sanjay Raut Property Seize By ED) आहे. 1034 कोटींच्या पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.

Sanjay Raut
ईडी फाईल फोटो

मुंबई - शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut Property Seize By ED) यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. राऊत यांची ११.१५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. याबरोबर ८ भूखंड आणि मुंबईच्या दादर परिसरातील एक फ्लॅट देखील ईडीने जप्त केला आहे. 1034 कोटींच्या पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. याच प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना ईडीने यापूर्वीच अटक केली होती. दरम्यान, संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीला गेले आहेत.

ed press note
ईडीचे पत्रक

काय आहे पत्रा चाळ प्रकल्प - तपासात असे दिसून आले आहे की, गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडला 672 भाडेकरूंच्या पुनर्वसनासाठी पत्रा चाळ प्रकल्पाच्या विकासाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. संबंधित काळात राकेश कुमार वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत हे गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक होते. सोसायटी म्हाडा आणि गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला. करारानुसार विकासक प्रदान करेल 672 भाडेकरूंना फ्लॅट आणि म्हाडासाठी फ्लॅट विकसित करा आणि त्यानंतर उर्वरित क्षेत्र विकासकाने विकले जाईल. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन्सच्या संचालकांनी म्हाडाची दिशाभूल करून 9 विकासकांना एफएसआय विकून अंदाजे 901.79 कोटी रुपये 672 विस्थापितांसाठी वसूल केली. म्हाडाच्या भागासाठी पुनर्वसन करण्यात आले नाही. पुढे गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडने देखील मीडोज नावाचा एक प्रकल्प सुरू केला आहे आणि फ्लॅट खरेदीदारांकडून सुमारे 138 कोटी रुपयांचे बुकिंग घेतले आहे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांनी बेकायदेशीर कृत्यांमधून केलेल्या गुन्ह्याची एकूण रक्कम अंदाजे 1039.79 कोटी. होती. गुन्ह्याच्या कमाईचा काही भाग जवळच्या सहकाऱ्यांना हस्तांतरित करण्यात आला.

  • #WATCH "... I'm not one to get scared, seize my property, shoot me, or send me to jail, Sanjay Raut is Balasaheb Thackeray's follower & a Shiv Sainik, he'll fight & expose everyone. I'm not one to stay quiet, let them dance. The truth will prevail": Shiv Sena leader Sanjay Raut pic.twitter.com/UzIdBKN9mc

    — ANI (@ANI) April 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वर्षा राऊत यांच्या बँक खात्याची चौकशी - आतापर्यंत केलेल्या मनी ट्रेल तपासात असे समोर आले आहे की, एचडीआयएलकडून प्रवीण राऊतच्या खात्यात सुमारे 100 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. ही रक्कम प्रवीण राऊत यांनी त्यांचे जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य, त्यांच्या व्यावसायिक संस्था इत्यादींच्या विविध खात्यांमध्ये वळती केली होती. 2010 मध्ये गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेपैकी 55 लाख रुपये वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा झाल्याचेही उघड झाले आहे. वर्षा राऊत संजय राऊत यांच्या पत्नी आहेत.

  • असत्यमेव जयते!!

    — Sanjay Raut (@rautsanjay61) April 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया - ईडीच्या कारवाईवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. आम्ही खोटेपणाला घाबरत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कारवाईने विरोधकांनी आपली कबर खोदण्यास सुरुवात केली असल्याचे ते म्हणाले. संजय राऊत सध्या दिल्लीत आहेत. ते म्हणाले, 'ईडीने कोणतीही नोटीस न देता माझ्या घरावर कारवाई केली आहे. ईडीला कितीही उड्या मारू देत, ते तोंडावर पडणार आहेत. माझे मुख्यमंत्र्यांशीही बोलणे झालेले आहे. तुम्हाला (ईडीला) फाट्यावर मारतो. संजय राऊत खोटेपणाला घाबरत नाही. तुम्ही तुमची कबर खोदायला सुरूवात केली आहे. दाम दुपटीने वसुल करु'. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी देली आहे.

Last Updated :Apr 5, 2022, 4:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.