ETV Bharat / city

Minister K C Padvi : आदिवासी समाजाचे मंत्री के. सी. पाडवी यांच्या बंगल्या बाहेर आंदोलन

author img

By

Published : Mar 7, 2022, 9:57 AM IST

Updated : Mar 7, 2022, 12:14 PM IST

आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी ( Tribal Development Minister K C Padvi ) यांच्या निवासस्थानाबाहेर आदिवासी समाजाने ठिय्या आंदोलन ( Tribal People Agitation ) सुरू केले आहे. वनजमीन हक्क कायद्याची ( Forest Land Rights Act ) अंमलबजावणी करण्याची त्यांची मागणी आहे.

An agitation outside the bungalow of Tribal Development Minister KC Padavi
आदिवासी विकास मंत्री के सी पडवी यांच्या बंगल्या बाहेर आंदोलन

मुंबई - आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी ( Tribal Development Minister K C Padvi ) यांच्या निवासस्थानाबाहेर आदिवासी समाजाने ठिय्या आंदोलन ( Tribal People Agitation ) सुरू केले आहे. वनजमीन हक्क कायद्याची ( Forest Land Rights Act ) अंमलबजावणी करण्याची त्यांची मागणी आहे. लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

वन हक्क जमिनीच्या मुद्द्यावरून आदिवासी मंत्री के. सी. पाडवी यांच्या शासकीय निवासस्थानी सकाळी आदिवासी तसेच शेतकऱ्यांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. अगदी सकाळच्या वेळी अनपेक्षितपणे झालेल्या या आंदोलनामुळे सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांची मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. महाविकास आघाडी सरकार वन जमीन हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे वनजमीन अजूनही आदिवासी बांधवांच्या नावावर झाली नाहीत. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी या मुख्य मागणीसाठी शेकडो आदिवासी बांधवांनी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केले.

हेही वाचा - ...तर मग गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलांचीही चौकशी करा -प्रवीण दरेकर

वन हक्क जमीन कायद्याची अंमलबजावणी व्हावी -

लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले असून आदिवासी मंत्री के. सी. पाडवी यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता त्यांच्याकडून करण्यात आलेली नाही. वन हक्क जमीन कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झाल्यास त्याचा फायदा आदिवासी समाजाला होईल. अनेक प्रकरणांमध्ये वनहक्क जमीनीच्या बाबतीत आदिवासींचे दावे मान्य झालेले नसल्यामुळे नाही लागा वस्त हे आंदोलन करावे लागत असल्याचं लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे म्हणाल्या आहेत.

Last Updated : Mar 7, 2022, 12:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.