ETV Bharat / city

Loudspeaker Controversy : 'कुठं योगी आणि कुठं भोगी', भोंग्यांचा मुद्द्यावरून राज्य सरकारवर मनसे आणि अमृता फडणवीसांची टीका

author img

By

Published : Apr 28, 2022, 7:56 PM IST

Updated : Apr 28, 2022, 10:23 PM IST

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने सर्व मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवण्याचा ( Yogi Adityanath Remove Loudspeaker On Mosque ) निर्णय घेतला आहे. योगी सरकारच्या निर्णयाचं राज ठाकरेंनी ( Raj Thackeray Congratulations Yogi Adityanath ) अभिनंदन केलं व महाविकास आघाडी सरकारला टोला देखील लगावला. यावरून आता अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis Tweet Uddhav Thackeray ) यांनीही ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Loudspeaker Controversy
Loudspeaker Controversy

मुंबई - मुंबईत 2 एप्रिलला गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी हिंदुत्वाचा नारा देत मशिदींवरील भोंग्यांचा विषय छेडला. 'आमची मागणी कायद्याला धरून आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन झालेच पाहिजे' असं राज ठाकरे यांनी आपल्या सभेत म्हटलं होतं. यानंतर देशभरात मशिदींवरील भोंग्यांचा विषयावर चर्चा होऊ लागली. यावरूनच उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने सर्व मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवण्याचा ( Yogi Adityanath Remove Loudspeaker On Mosque ) निर्णय घेतला आहे. योगी सरकारच्या निर्णयाचं राज ठाकरेंनी ( Raj Thackeray Congratulations Yogi Adityanath ) अभिनंदन केलं व महाविकास आघाडी सरकारला टोला देखील लगावला. यावरून आता अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis Tweet Uddhav Thackeray ) यांनीही ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

अमृता फडणवीस यांची टीका - मनसे नंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. या संदर्भात अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं असून 'ऐ भोगी कुछ तो सिक हमारे योगी से' असं अमृता यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संदिप देशपांडेंचे प्रत्युत्तर? - '2005 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जे अनधिकृत भोंगे आहेत, ते उतरले पाहिजेत. हाच मुद्दा दोन तारखेला राज ठाकरे यांनी आपल्या सभेत उपस्थित केला. त्याची देशभर चर्चा झाली आणि योगींनी आपल्या राज्यात हे अनधिकृत भोंगे उतरवायला सुरुवात केली. त्यानंतर राज ठाकरेंनी योगींचे कौतुक केले. जे काम करतात त्यांच कौतुक केलं जातं, जी लोक गरीब असतात आणि फक्त फेसबुकवर लाईव्ह येऊन टोमणे मारायचं काम करतात, अशा टोमणे सम्राटांचा अभिनंदन नाही होऊ शकत, असे प्रत्युत्तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिले आहे.

प्रतिक्रिया

काय म्हटलं होतं राज ठाकरे यांनी? - दरम्यान, योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की, 'उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील विशेषता मशिदीवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही. आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी' महाराष्ट्र सरकारला सुबुद्धी मिळो, हिच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना., असे ट्वीट राज ठाकरे यांनी केले होते.

हेही वाचा - Maxwell Wedding Function : वेडिंग फंक्शनमध्ये 'ऊं अंटावा' गाण्यावर विराटने धरला ठेका; अनुष्का शर्माने शेअर केले फोटो

Last Updated : Apr 28, 2022, 10:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.