ETV Bharat / city

Kolhapur By Election : मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर राजेश क्षीरसागरांची प्रतिक्रिया; म्हणाले, मी नाराज नव्हतो मात्र...

author img

By

Published : Mar 21, 2022, 7:48 PM IST

स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीला कोल्हापूर उत्तर ( Kolhapur By Election ) येथून उमेदवारी दिली आहे. त्यावरुन शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर नाराज होते. त्याच पार्श्वभूमीवर राजेश क्षीरसागर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित आघाडीच्या नेत्यांसोबत आज बैठक ( Rajesh kshirsagar Meeting Cm Uddhav Thackeray ) झाली.

Rajesh kshirsagar
Rajesh kshirsagar

मुबंई - कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या ( Kolhapur By Election ) उमेदवारीवरुन महाविकास आघाडीत नाराजी नाट्य दिसत होते. स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीला येथून उमेदवारी दिली आहे. त्यावरुन शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर ( Shivsena Leader Rajesh kshirsagar ) नाराज होते. त्याच पार्श्वभूमीवर नाराजी दूर करण्यासाठी राजेश क्षीरसागर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Rajesh kshirsagar Meeting Cm Uddhav Thackeray ) यांच्यासहित आघाडीच्या नेत्यांसोबत आज बैठक झाली.

विधानभवन येथील मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार विनायक राऊत, मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. या बैठकीनंतर आपण कधीही नाराज नव्हतो, केवळ स्थानिक शिवसैनिक नाराज होते, असे बैठकीनंतर बोलताना राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

राजेश क्षीरसागर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

पुढे राजेश क्षीरसागर म्हणाले की, कोल्हापूर मध्य मतदारसंघ हा शिवसेनेकडे असावा, असे आपले मत होते. याबाबत आपली कोणतीही नाराजी नव्हती. मात्र, स्थानिक शिवसैनिकांची इच्छा असल्याने याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली. येणाऱ्या काळात सर्व ताकतीनिशी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

भारतीय जनता पक्षाच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये प्रचंड राग आहे. शिवसेनेच्या हाताला धरून महाराष्ट्रात भाजपा मोठी झाली. मात्र, 2014 नंतर शिवसेनेच्या डोक्यावर पाय ठेवण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात आला. सत्ता आल्यानंतर भाजपाने उन्माद केला, याची चीड शिवसैनिकांमध्ये आहे. त्यामुळे कोल्हापूर पोटनिवडणुकीत आघाडीचा उमेदवार जिंकेल, अशा विश्वासही राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - Beed Officer Suspended : मुजोरपणा नडला! बीड नगरपरिषदेचे चार अधिकारी निलंबित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.