ETV Bharat / city

Money Laundering : ऋषिकेश देशमुखची सक्रियता, ईडीचे प्रतिज्ञापत्र!

author img

By

Published : Nov 23, 2021, 7:35 PM IST

अनिल देशमुख
अनिल देशमुख

मनी लाँड्रिंग प्रकरण (Money Laundering Case) महाराष्ट्र पोलीस आस्थापनातील एका कथित खंडणी टोळीशी संबंधित प्रकरणात देशमुखां(Anil Deshmukh)ना अंमलबजावणी संचालनालया(ED)कडून अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यातच ऋषिकेश यांनाही सन्मस बजावल्यामुळे त्यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. ईडी (ED) जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवत असून पूर्वग्रहदूषित पद्धतीने तपास सुरू असल्याचा दावा ऋषिकेश यांनी अर्जातून केला आहे.

मुंबई - मनी लाँडरिंग (Money Laundering) प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा (Anil Deshmukh) मुलगा ऋषीकेश देशमुखचा सक्रिय सहभागी असून वडिलांनी मिळविलेली रक्कम देणगी म्हणून दाखविण्यात त्याचा महत्त्वाचा सहभाग आहे, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED)वतीने विशेष न्यायालयात करण्यात आला आहे.

'पूर्वग्रहदूषित पद्धतीने तपास'

मनी लाँड्रिंग प्रकरण (Money Laundering Case) महाराष्ट्र पोलीस आस्थापनातील एका कथित खंडणी टोळीशी संबंधित प्रकरणात देशमुखां(Anil Deshmukh)ना अंमलबजावणी संचालनालया(ED)कडून अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यातच ऋषिकेश यांनाही सन्मस बजावल्यामुळे त्यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. ईडी (ED) जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवत असून पूर्वग्रहदूषित पद्धतीने तपास सुरू असल्याचा दावा ऋषिकेश यांनी अर्जातून केला आहे.

चालविल्या जातात 11 कंपन्या

या अर्जाला ईडीने एका प्रतिज्ञापत्रामार्फत विरोध केला आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात ऋषिकेशचा सक्रिय सहभाग आहे. देशमुख आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून तब्बल अकरा कंपन्या चालविल्या जात असल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये उघड झाले आहे. यापैकी बहुतांश कंपन्यांमध्ये ऋषिकेश संचालक किंवा भागधारक आहेत.

पुरावे प्रभावित होण्याची शक्यता

देशमुख यांना ईडीने अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जाला ईडीने एका प्रतिज्ञापत्राद्वारे विरोध केला आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात ऋषिकेशचा सक्रिय सहभाग आहे. मनी लाँडरिंगचा पैसा विविध कंपन्यांना दान म्हणून दाखवण्यात ऋषिकेशने देशमुख यांना मार्गदर्शन केले, असा गंभीर आरोप ईडीच्या वतीने केला आहे. ऋषिकेशला जामीन मंजूर झाल्यास त्याच्याकडून या प्रकरणातील पुरावे प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करू नये, असे ईडीने म्हटले आहे. ऋषिकेश तपासाला सहकार्य करत नाहीत, असा आरोप ईडीने केला आहे. आता पुढील सुनावणी ४ डिसेंबर रोजी होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.