ETV Bharat / city

Work of a Tunnel in Mumbai : कोस्टल रोडचा दुसऱ्या बोगद्याचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करू- आदित्य ठाकरे

author img

By

Published : May 4, 2022, 9:52 PM IST

दक्षिण मुंबईमधून पश्चिम उपनगरात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यावर उपाय म्हणून महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेने कोस्टल रोड प्रकल्प ( Aditya Thackeray work on Coastal Road  ) हाती घेतला आहे. सध्या कोरोनानंतर कोस्टल रोडचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. आज राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोस्टल रोडचा कामाची ( Aditya Thackeray visit work progress ) पाहणी केली.

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे

मुंबई - शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचे ( Work on the Coastal Road ) काम सध्या वेगाने सुरू आहे. आज राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ( Environment Minister Aditya Thackeray ) कोस्टल रोडचा कामाची पाहणी केली. यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी सांगितले की, एका बोगद्याचे काम पूर्ण झाले ( work of a tunnel in Mumbai ) आहे. आता दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू आहे. साधारण पुढच्या वर्षीच्या डिसेंबर पर्यंत काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

डिसेंबर 2023 पर्यत काम पूर्ण होण्याचा विश्वास- दक्षिण मुंबईमधून पश्चिम उपनगरात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यावर उपाय म्हणून महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेने कोस्टल रोड प्रकल्प ( Aditya Thackeray work on Coastal Road ) हाती घेतला आहे. सध्या कोरोनानंतर कोस्टल रोडचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. आज राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोस्टल रोडचा कामाची ( Aditya Thackeray visit work progress ) पाहणी केली. यादरम्यान त्यांनी सांगितले की, कोस्टल रोड, वरळी शिवडी लिंक, एसटीएचएल असेल हे तिन्ही रोड मुंबईसाठी अगदी महत्त्वाचे आहेत. कोरोनामुळे कोस्टल रोडचे काम रखडले होते. रखडलेले काम प्रगतीपथावर पूर्ण करण्यात येत आहे. साधारणपणे आम्ही 2023 पर्यंत हे रोड आम्ही तयार करू शकू, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

फडणवीसांचा टीकेवर उत्तर नाही- भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचले आहे. फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना मर्सिडीज बेबी असे नवीन नाव दिले आहे. यावर पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना प्रश्न केला असता त्यांनी सांगितले की, राजकीय विषयावर बोलण्याची ही जागा नाही. आम्ही राजकीय विषयापेक्षा विकासाच्या विषयांवर बोलू असे म्हणत, फडणवीसांचा टीकेला उत्तर देण्याचे आदित्य ठाकरे यांनी टाळले आहे.

हेही वाचा-Punjab school bus catches fire : पंजाबमध्ये शाळेची बस पेटल्याने भीषण अपघात; तीन विद्यार्थी गंभीर जखमी

हेही वाचा-BSF soldiers on Indo Pak border : भारत-पाक सीमेवर जवानांची सहनशक्ती पाहा.. कडक उन्हात ठेवलेला पापड एका मिनिटात भाजतो!

हेही वाचा-Tata Technologies : टाटा टेक्नॉलॉजी पंजाबमध्ये सुरू करणार ईव्ही प्रोडक्शन सेंटर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.