ETV Bharat / city

Maharashtra Corona Update : राज्यात गुरुवारी 6 हजार कोरोना रुग्णांची नोंद; 45 रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : Feb 10, 2022, 8:06 PM IST

Updated : Feb 10, 2022, 8:13 PM IST

आज 6 हजार रुग्ण ( 6000 Corona Patients Found Today ) आढळून आले असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या तिप्पट आहे. तर मृत्यू होणाऱ्यांची संख्या 45 इतकी आहे.

Maharashtra Corona Update
Maharashtra Corona Update

मुंबई - कोरोनाच्या ( Maharashtra Corona ) रुग्णसंख्येत दिवसेंदिवस चढ उतार दिसून येत आहेत. आज (गुरुवारी) 6 हजार रुग्ण ( 6000 Corona Patients Found Today ) आढळून आले असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या तिप्पट आहे. तर मृत्यू होणाऱ्यांची संख्या 45 इतकी आहे. बुधवारी 7 हजार रुग्ण तर 92 जणांचा मृत्यू झाला होता. मागील आठ दिवसांपासून ओमयक्रॉनचे 121 रुग्ण सापडल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

कोरोनाचा बुधवारी आलेख वाढला होता. सुमारे 7 हजार 142 नव्या रुग्ण आढळून आले होते. आज (गुरुवारी) 6 हजार 248 रुग्ण सापडले असून 45 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत मृत्यूदर 1.83 टक्के इतके स्थिर स्थावर आहे. 18 हजार 942 इतके रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. मात्र आतापर्यंत बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या 76 लाख 12 हजार 233 इतकी आहे. हे प्रमाण 97.22 टक्के इतके आहे. 7 कोटी 60 लाख 40 हजार 567 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 10.30 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 29 हजार 633 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 53 हजार 175 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2368 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 70 हजार 150 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

ओमायक्रॉनचे 121 रुग्ण

राज्यात ओमायक्रॉनचा मागील आठवड्यापासून एकही नवा रुग्ण आढळून आलेला नव्हता. मात्र आज 121 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक नागपूर 82, वर्धा 14, पुणे मनपा 9, सिंधुदुर्ग 8, धुळे, लातूर, अमरावती आणि यवतमाळ प्रत्येकी 2 रुग्ण सापडले आहेत. तसेच आजपर्यंत 3 हजार 455 एवढे रुग्ण बाधित झाले आहेत. तर 2291 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 8081 जणांची जनुकीय चाचणी केली. 7179 चाचण्याचे अहवाल प्राप्त झाले असून 902 नमुने प्रलंबित आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण

मुंबई महापालिका - 429
ठाणे - 63
ठाणे मनपा - 93
नवी मुंबई पालिका - 92
कल्याण डोबिवली पालिका - 40
मीरा भाईंदर - 11
वसई विरार पालिका - 13
नाशिक - 74
नाशिक पालिका - 142
अहमदनगर - 383
अहमदनगर पालिका - 97
पुणे - 357
पुणे पालिका - 882
पिंपरी चिंचवड पालिका - 358
सातारा - 186
नागपूर मनपा - 333

हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत आज ४२९ नव्या रुग्णांची नोंद, २ रुग्णाचा मृत्यू

Last Updated : Feb 10, 2022, 8:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.