ETV Bharat / city

राज्यात आज ६ हजार ८५७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; २८६ रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : Jul 28, 2021, 10:47 PM IST

राज्यात आज ६ हजार ८५७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २८६ मृत्यूची नोंद झाली आहे.

Corona patient death number Maharashtra
कोरोना रुग्ण डिस्चार्ज महाराष्ट्र

मुंबई - राज्यात आज ६ हजार ८५७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनाचे रविवारी, १८ जुलैला ९ हजार रुग्ण आढळून आले होते. त्यात घट होऊन शनिवारी ६ हजार २६९, रविवारी ६ हजार ८४३, तर सोमवारी ४ हजार ८७७ रुग्णांची नोंद झाली होती. त्यात काल मंगळवारी वाढ होऊन ६ हजार २५८ रुग्णांची नोंद झाली होती.

हेही वाचा - छट पूजा आणि दिवाळीसाठी रेल्वे गाड्या हाऊसफुल; बहुतांश गाड्या प्रतीक्षा यादीत!

सोमवारी ५३ मृत्यूची नोंद झाली होती. त्यात वाढ होऊन मंगळवारी २५४ मृत्यूंची नोंद झाली. आज त्यात आणखी वाढ होऊन २८६ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ६ हजार १०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

६ हजार १०५ रुग्णांना डिस्चार्ज -

राज्यात आज ६ हजार १०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६० लाख ६४ हजार ८५६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५३ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ६ हजार ८५७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून २८६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३२ हजार १४५ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ७३ लाख ६९ हजार ७५७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ८२ हजार ९१४ (१३.२६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ८८ हजार ५३७ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ८२ हजार ५४५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृत्यू संख्या वाढली -

१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४ मृत्यूंची नोंद झाली होती. त्यात आज वाढ होऊन २८६ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई - ४०३
रायगड - २७३
अहमदनगर - ११०१
पुणे - ५९३
पुणे पालिका - ३०७
पिपरी चिंचवड पालिका - २०८
सोलापूर - ५१०
सातारा - ६७७
कोल्हापूर - २९८
कोल्हापूर पालिका - १६२
सांगली - ६२८
सिंधुदुर्ग - २१८
रत्नागिरी - २७६
बीड - २४४

जुलैमध्ये आतापर्यंतची दैनंदिन रुग्णसंख्या

28 जुलै - 6857 नवे रुग्ण
27 जुलै - 6258 नवे रुग्ण
26 जुलै - 4877 नवे रुग्ण
25 जुलै - 6843 नवे रुग्ण
24 जुलै - 6269 नवे रुग्ण
23 जुलै - 6753 नवे रुग्ण
22 जुलै - 6753 नवे रुग्ण
22 जुलै - 7302 नवे रुग्ण
21 जुलै - 8159 नवे रुग्ण
20 जुलै - 6910 नवे रुग्ण
19 जुलै - 6017 नवे रुग्ण
18 जुलै - 9000 नवे रुग्ण
17 जुलै - 8172 नवे रुग्ण
16 जुलै - 7761 नवे रुग्ण
15 जुलै - 8010 नवे रुग्ण
14 जुलै - 8602 नवे रुग्ण
13 जुलै - 7243 नवे रुग्ण
12 जुलै - 7603 नवे रुग्ण
11 जुलै - 8535 नवे रुग्ण
10 जुलै - 8296 नवे रुग्ण
9 जुलै - 8992 नवे रुग्ण
7 जुलै - 9558 नवे रुग्ण
5 जुलै - 6740 नवे रुग्ण
4 जुलै - 9336 नवे रुग्ण
3 जुलै - 9489 नवे रुग्ण
2 जुलै - 8753 नवे रुग्ण
1 जुलै - 9195 नवे रुग्ण

हेही वाचा - मुंबईतील परमबीर सिंह यांच्या निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.