ETV Bharat / city

Karan Johar Party : करण जोहरची पार्टी ठरली कोरोनाची सुपर स्प्रेडर

author img

By

Published : Jun 5, 2022, 8:52 PM IST

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहर (Famous Producer-Director Karan Johar) यांची पार्टी दुसऱ्यांदा कोरोनाची हॉटस्पॉट ठरली आहे. (Karan Johar Party Super Spreader) करण जोहरच्या वाढदिवसाच्या (On Karan Johar Birthday) पार्टीत सहभागी झालेल्या कार्तिक आर्यनसह ५० ते ५५ बॉलीवूड कलाकारांना कोरोनाची लागण (Corona Infection of Bollywood Actors) झाली आहे.

Film Director Producer Karan Johar
फिल्म निर्देशक निर्माता करण जोहर

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहर (Director Karan Johar) यांची पार्टी दुसऱ्यांदा कोरोनाची हॉटस्पॉट ठरली आहे. करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेल्या ५० ते ५५ बॉलीवूड कलाकारांना कोरोनाची लागण (Corona Infection of Bollywood Actors) झाली आहे. यामुळे करण जोहर यांची पार्टी कोरोनाची सुपर स्प्रेडर ठरली आहे. यामुळे पालिकेने कोरोना नियमांचे पालन करा, असे आवाहन नागरिकांना केले आहे.

पार्टी ठरली सुपर स्प्रेडर : करण जोहर याने आपल्या ५० व्या वाढदिवसानिमित्त (On the Occasion of Karan Johar 50th birthday) यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलिवूडमधील ऋतिक रोशन, कतरिना कैफ, करिना कपूर, सैफ अली खान, सलमान खान आदी कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीत सहभागी झालेल्यांपैकी ५० ते ५५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अनेकांनी आपण पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्याचे टाळले आहे. गेल्या वर्षीदेखील करण जोहरच्या घरी एका पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीनंतर अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली होती.

कैटरिना, कार्तिक आर्यन पॉझिटिव्ह : दरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री कैटरिना कैफ आणि अभिनेता कार्तिक आर्यन कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. - 'भूल-भुलैया- २' चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करणाऱ्या अभिनेता कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेत्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मार्च २०२१ मध्ये देखील कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण झाली होती. कार्तिकच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भूल-भुलैया-२' या चित्रपटाने कमाईचे विक्रम प्रस्थापित केले आहेत.


कोरोना नियमांचे पालन करा : दरम्यान, कोरोना नियमांचे म्हणजेच मास्क घालणे, हात सतत धुणे, सुरक्षित अंतर पाळावे याचे पालन करावे. राज्य सरकारने दिलेल्या गाईडलाईनचे पालन करावे, असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी केले आहे.

हेही वाचा : करण जोहरच्या बर्थडे बॅशमध्ये शाहरुख खानची जबरा एन्ट्री, डान्स व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.