ETV Bharat / city

मुंबई पोलिसांकडून वेश्याव्यवसायाचे रॅकेट उद्ध्वस्त, 4 आरोपींना अटक

author img

By

Published : Oct 22, 2020, 12:08 PM IST

लॉकडाउन दरम्यान तरुणींना मुंबईत आणून त्यांना जबरदस्ती देहविक्री करायला लावणाऱ्या 4 आरोपींना अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक 8 ने ही कारवाई केली.

4 accused of prostitution arrested
देहविक्रीच्या धंदा करायला लावणाऱ्या 4 आरोपींना अटक

मुंबई - चांगल्या पगाराची नोकरीचे आमिष दाखवून लॉकडाऊनदरम्यान पश्चिम बंगालमधील तरुणींना मुंबईत आणून त्यांना जबरदस्ती देहविक्री करायला लावणाऱ्या 4 चौघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक 8ने ही कारवाई केली.

काही इसम हे एका मोबाईल क्रमांकावर संपर्क केलेल्या ग्राहकांना मुली पुरवत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या युनिट 8ला मिळाली होती. यावरून पोलिसांनी बोगस गिऱ्हाईकाचा वापर करून या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला आणि मुलीची मागणी केली. त्याला अनुसरून आरोपीने बोगस ग्राहकाच्या मोबाईल क्रमांकावर काही मुलींचे फोटो पाठवले होते. त्यातील एका मुलीची निवड केल्यानंतर कांदिवली परिसरातील एका हॉटेलमध्ये मुलगी पाठवत असल्याचे आरोपीने सांगितले.

हेही वाचा-लोणावळा पोलिसांनी मोबाईल हिसकावणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात

या प्रकरणातील आरोपी रंजित हा एका मुलीसोबत असता त्यास पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून यातील आणखीन एक आरोपी संजय याने WWW.IN.LOCAN.TO या वेबसाईटवर त्याचा मोबाईल नंबर रजिस्टर केला होता. या मोबाईल क्रमांकच्या साह्याने पीडित मुली ह्या वेश्यागमनासाठी पुरविण्यात येत होत्या.

पुढील चौकशीत मिळालेल्या माहितीवरून या आरोपीने दहिसर पूर्व परिसरात परराज्यातील आणखीन 3 मुलींना एका घरात ठेवले असल्याचे समजले. मिळालेल्या पत्त्यावर क्राइम ब्रँचच्या अधिकार्‍यांनी छापा टाकला असता त्या ठिकाणी तीन मुली व तीन दलालांना ताब्यात घेण्यात आले होते.

हेही वाचा-ऑस्ट्रेलियन नागरिकाने नागपूरच्या तरुणीशी रचलं लग्न, बिंग फुटल्यानंतर ३५ लाखांचे दागिने केले लंपास

बसंत द्वारका मंडल (32), रंजीत दोही ठाकूर (23), शंभू केशव यादव (39) व आशिष कुमार मोहन (24) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातून सुखरूप सुटका करण्यात आलेल्या 44 महिलांची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.