ETV Bharat / city

रुग्णसंख्या वाढली; राज्यात ३ हजार ५३० नवे रुग्ण, ५२ मृत्यू

author img

By

Published : Sep 14, 2021, 10:02 PM IST

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. काल रुग्णसंख्या घटून २ हजार ७४० रुग्ण आढळून आले, तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

corona patients number maharashtra
कोरोना रुग्ण डिस्चार्ज संख्या महाराष्ट्र

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. काल रुग्णसंख्या घटून २ हजार ७४० रुग्ण आढळून आले, तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज मंगळवार, १४ सप्टेंबर रोजी त्यात वाढ होऊन ३ हजार ५३० नवे रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा - केंद्राकडील राज्याच्या प्रलंबित विषय तातडीने मार्गी लागणार; नीती आयोगाची मुख्यमंत्र्यांना ग्वाही

आज ५२ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३ हजार ६८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०६ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ४९,६७१ सक्रिय रुग्ण

राज्यात आज दिवसभरात ३ हजार ६८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख १२ हजार ७०६ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०६ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ३ हजार ५३० नवीन रुग्णांचे निदान झाले असून ५२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३८ हजार २२१ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ६२ लाख २५ हजार ३०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ४ हजार १४७ (११.५७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९६ हजार १७६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात साध्य ४९ हजार ६७१ सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्णसंख्येत चढउतार

२६ ऑगस्टला ५१०८, ३० ऑगस्टला ३,७४१, ३१ ऑगस्टला ४१९६, १ सप्टेंबरला ४४५६, २ सप्टेंबरला ४३४२, ३ सप्टेंबरला ४३१३, ४ सप्टेंबरला ४१३०, ५ सप्टेंबरला ४०५७, ६ सप्टेंबरला ३६२६, ७ सप्टेंबरला ३९८८, ८ सप्टेंबरला ४१७४, ९ सप्टेंबरला ४२१९, १० सप्टेंबरला ४१५४, ११ सप्टेंबरला ३०७५, १२ सप्टेंबरला ३६२३, १३ सप्टेंबरला २७४०, १४ सप्टेंबरला ३५३० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.

मृत्युदर २.१२ टक्के

१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, ९ ऑगस्टला ६८, १२ ऑगस्टला २०८, २५ ऑगस्टला २१६, ३० ऑगस्टला ५२, ३१ ऑगस्टला १०४, १ सप्टेंबरला १८३, २ सप्टेंबरला ५५, ३ सप्टेंबरला ९२, ४ सप्टेंबरला ६४, ५ सप्टेंबरला ६७, ६ सप्टेंबरला ३७, ७ सप्टेंबरला ८६, ८ सप्टेंबरला ६५, ९ सप्टेंबरला ५५, १० सप्टेंबरला ४४, ११ सप्टेंबरला ३५, १२ सप्टेंबरला ४६, १३ सप्टेंबरला २७, १४ सप्टेंबरला ५२ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात २.१२ टक्के इतका मृत्युदर नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण

मुंबई - ३६७
अहमदनगर - ८७०
पुणे - ३७२
पुणे पालिका - १८५
पिपरी चिंचवड पालिका - १४९
सोलापूर - २४४
सातारा - ३०१
सांगली - १७०

हेही वाचा - मुंबईत आज 5 दिवसाच्या बाप्पाला निरोप, दुपारी 3 वाजेपर्यंत 578 गणेश / गौरी मूर्तींचे विसर्जन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.