ETV Bharat / city

'पी-305 बार्ज'वरील 188 कर्मचाऱ्यांना नौदलाने वाचवले; 26 मृतदेह समुद्रातून काढले बाहेर

author img

By

Published : May 19, 2021, 7:42 PM IST

Updated : May 19, 2021, 10:23 PM IST

तौक्ते चक्रीवादळाचा फटका ‘बॉम्बे हाय’ परिसराला मोठ्या प्रमाणात बसला आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून पी-३०५ या बार्जचा नांगर वाहवत गेला आणि हे बार्ज समुद्रात भरकटले.

पी-305 बार्ज
पी-305 बार्ज

मुंबई - तौक्ते चक्रीवादळाचा फटका ‘बॉम्बे हाय’ परिसराला मोठ्या प्रमाणात बसला आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून पी-३०५ या बार्जचा नांगर वाहवत गेला आणि हे बार्ज समुद्रात भरकटले. त्यानंतर चक्रीवादळ आणि मुसळधार पावसातच नौदलाने युद्धपातळीवर शोध मोहीम हाती घेतली. बुधवारी एकूण 188 जणांना वाचवण्यात नौदलाला यश आले आहे. तर, 26 जणांचे मृतदेह अरबी समुद्रातून बाहेर काढले आहेत. शोधमोहीम नौदलाकडून अद्यापही सुरुच आहे.

पी - 305 बार्जवरील 185 कर्मचाऱ्यांना वाचवले

तौक्ते चक्रीवादळाच्या विळख्यात अडकलेल्या पी-305 या बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या बचाव कार्यासाठी भारतीय नौदलाच्या बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी 'आयएनएस कोची' आणि 'आयएनएस कोलकाता' यांच्यासोबत मिळून बचावकार्यास सुरुवात केली. याबरोबरच नौदलाच्या हेलिकॉप्टरचीसुद्धा या बचावकार्यात मदत घेतली. 17 मे रोजी सुरू झालेली ही मोहीम अद्यापही सुरू असून, आतापर्यंत 188 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी 124 जणांना मुंबईत सुरक्षित आणण्यात आले आहे. या बार्जवर एकूण २६१ कर्मचारी होते.

समुद्रात सहा जहाजे बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत - कमांडिंग ऑफिसर

दोन दिवसांपूर्वी जी गंभीर परिस्थिती होती, ती आता नियंत्रणात आहे. आयएनएस कोची नेहमीच अशा परिस्थितीत मदत करण्यासाठी तयार राहील. सध्या समुद्रात सहा जहाजे बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. तसेच, हेलिकॉप्टरचीही मदत घेतली जात आहे, अशी माहिती आयएनएस कोचीचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन सचिन यांनी दिली आहे.

हेही वाचा - अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे मोदींना पत्र; वैद्यकीय सुविधांचं ऑडिट करण्याची मागणी

मोहीम अवघड, मात्र लोकांना वाचवण्यात यश - मनोज झा (नौदल अधिकारी)

दरम्यान, अशा प्रकारच्या मोहिमा या नेहमीच अवघड असतात. केवळ आपत्कालीन स्थिती आहे म्हणून अतातायीपणा करणे शहाणपणाचे नसते. आतापर्यंत 188 लोकांना आम्ही वाचवले आहे. सर्व सुरक्षा दलांनी मिळून काम केल्यामुळे ही मोहीम यशस्वी होताना दिसून येत असल्याचे नौदल अधिकारी मनोज झा यांनी सांगितले.

११ तास होतो पाण्यात, मग नौदलाने वाचवला जीव : कर्मचारी

बार्ज बुडायला लागल्यामुळे आम्ही शेवटचा पर्याय म्हणून पाण्यात उड्या मारल्या. आम्ही लाईफ जॅकेट घातले होते. मात्र, वादळामुळे पाण्यात बुडण्याची शक्यताही होती. तब्बल ११ तास मी पाण्यात होतो. त्यानंतर नौदलाने येऊन आमचा जीव वाचवला. त्यासाठी नौदलाचे अनेक धन्यवाद, अशी प्रतिक्रिया बार्जवरील एका कर्मचाऱ्याने दिली.

नौदलाचे आभार मानताना 'बार्ज'वरील कर्मचाऱ्याला अश्रू अनावर -

'बार्ज पी३०५' वरील १८५ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात नौदलाला यश मिळाले आहे. यांपैकी काही कर्मचाऱ्यांना नौदलाच्या आयएनएस कोची जहाजाने किनाऱ्यावर आणण्यात आले. त्यानंतर बार्जवरील एका कर्मचाऱ्याला परिस्थितीबाबत विचारणा केली असता, तो अगदीच भावनिक झाला. नौदलाचे जवान नसते, तर आज आम्ही जिवंत राहिलो नसतो. केवळ नौदलामुळेच आम्ही हा दिवस पाहू शकलो असल्याचे त्याने सांगितले. हे सांगताना त्या कर्मचाऱ्याला अश्रू अनावर झाले.

हेही वाचा - जळगाव जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्याची पत्नी, मुलीसह आत्महत्या

Last Updated : May 19, 2021, 10:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.