ETV Bharat / city

Kolhapur Corona Update : कोल्हापूरातील रुग्णसंख्या 100 वरून 923 वर ; चाचण्यांमध्ये 'इतकी' वाढ

author img

By

Published : Jan 11, 2022, 5:44 PM IST

कोल्हापूरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढायला (Corona Kohapur Outbreak) सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात केवळ 10 ते 20 रुग्ण आढळत होते. सध्या 5 हजार 800 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 923 इतकी आहे.

Kolhapur Corona Update
Kolhapur Corona Update

कोल्हापूर : कोल्हापूरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढायला (Corona Kohapur Outbreak) सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात केवळ 10 ते 20 रुग्ण आढळत होते. मात्र हीच संख्या दीडशे पार झाली असून 1 जानेवारी रोजी सक्रिय रुग्णांची संख्या 100 होती. तीच आता 923 वर पोहोचली आहे. आजपर्यंत 2 लाख 7 हजार 958 इतके रुग्ण आढळले आहेत. त्यातील 2 लाख 1 हजार 235 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 5 हजार 800 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 923 इतकी आहे. यातील केवळ 111 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा शक्य चिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी दिली.

Kolhapur Corona Update
कोल्हापूरमध्ये कोरोनाचा शिरकाव
1 ते 10 जानेवारी पर्यंत कोरोना रु्गणसंख्या
1 जानेवारी : एकूण चाचण्या - 775, नवे रुग्ण 18, ऍक्टिव्ह रुग्ण - 100
2 जानेवारी : एकूण चाचण्या - 1094 - , नवे रुग्ण - 21, ऍक्टिव्ह रुग्ण - 111
3 जानेवारी : एकूण चाचण्या - 652 , नवे रुग्ण - 29, ऍक्टिव्ह रुग्ण - 137
4 जानेवारी : एकूण चाचण्या - 820, नवे रुग्ण - 37, ऍक्टिव्ह रुग्ण - 172
5 जानेवारी : एकूण चाचण्या - 1245 , नवे रुग्ण - 69 , ऍक्टिव्ह रुग्ण - 238
6 जानेवारी : एकूण चाचण्या - 1015 , नवे रुग्ण - 68, ऍक्टिव्ह रुग्ण - 301
7 जानेवारी : एकूण चाचण्या - 1538, नवे रुग्ण - 176, ऍक्टिव्ह रुग्ण - 464
8 जानेवारी : एकूण चाचण्या - 1676 , नवे रुग्ण - 136 , ऍक्टिव्ह रुग्ण - 581
9 जानेवारी : एकूण चाचण्या - 2083, नवे रुग्ण - 223 , ऍक्टिव्ह रुग्ण - 791
10 जानेवारी : एकूण चाचण्या - 1343 , नवे रुग्ण - 185, ऍक्टिव्ह रुग्ण - 923
यामध्ये विशेष म्हणजे 1 ते 5 जानेवारीमध्ये एकूण 4 हजार 586 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्यामधील 174 जणांना कोरोनाची लागण झाली. तर 6 ते 10 जानेवारी दरम्यान एकूण 7 हजार 610 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामधील 788 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे चाचण्या सुद्धा वाढल्या असून कोरोना रुग्णांची संख्याही त्या प्रमाणात अधिक वाढल्या आहेत.
Kolhapur Corona Update
लसीकरण

वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1 वर्षाखालील - 358 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 7641 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 17602 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 119504 रुग्ण
51 ते 70 वर्ष - 49854 रुग्ण
71 वर्षांवरील - 12999 रुग्ण
जिल्ह्यात असे एकूण 2 लाख 7 हजार 958 रुग्ण झाले आहेत.
हेही वाचा - गेल्या 24 तासांत मुंबई पोलीस दलातील 120 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.