ETV Bharat / city

मंत्री आदित्य ठाकरेंना स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेकडून निवेदन; वचननाम्यातील आश्वासनाची पूर्तता करण्याची मागणी

author img

By

Published : Feb 20, 2022, 8:29 PM IST

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज (रविवारी) आणि उद्या (सोमवारी) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या वचननाम्याची तातडीने पुर्तता करा, अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेने केली आहे.

निवेदन देताना पदाधिकारी
निवेदन देताना पदाधिकारी

कोल्हापूर - शिवसेनेच्या वतीने 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या वचननाम्याची तातडीने पुर्तता करा, अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. आदित्य ठाकरे आज (रविवारी) आणि उद्या (सोमवारी) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी शिरोळमधील नृसिंहवाडी मंदिराला भेट देत श्री. दत्ताचे दर्शन घेतले. त्यानंतर मंत्री ठाकरे यांना निवेदन देत ही मागणी केली आहे.

काय म्हटले आहे निवेदनात?

शिवसेना पक्षाच्या वतीने जनतेला विधानसभा 2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीत वचननामा दिलेला होता. यामध्ये विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने वचननाम्यामध्ये विविध योजनेचा उल्लेख केला आहे. युवा सरकार फेलो अर्थात राज्यातील 15 लाख पदवीधर युवकांना शिष्यवृत्ती संधी दिली जाईल. तसेच तालुका व जिल्हास्तरावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 2500 विशेष बसची सेवा सुरू केली जाईल. यासह अनेक योजनेची माहिती विद्यार्थ्यांच्यासाठी शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये करण्यात आलेली आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरत चाललेली आहे. कोरोनामुळे शेतकरी, कामगार, शेतमजूर, लहान उद्योजक, व्यापारी यांची आर्थिक परिस्थिती पूर्णतः कोलमोडली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अवस्था तर अतिशय वाईट आहे. त्यांना शैक्षणिक फी भरणे देखील अवघड झालेले आहे. अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडे येताना बसची सोय नसल्याने चालत यावे लागते. शाळा तिथे बस ही योजना ग्रामीण भागात लागू पडताना दिसत नाही. पदवीधर युवकांच्या हाताला रोजगार नाही. नोकरी तर दूूरची गोष्ट आहे. आपण आपल्या वचननाम्यामध्ये पदवीधर युवकांना शिष्यवृत्ती देणार असल्याचे नमूद केले होते. मात्र अद्यापही याची कुठेही अंमलबजावणी झालेली नाही असेही या निवेदनात म्हटले.

'विद्यार्थी मोठ्या आशेने आपल्या सरकारकडे पाहतात'

मोठ्या आशेने राज्यातील विद्यार्थी आपल्या महाविकासआघाडी सरकारकडे पाहतो आहे. हेच विद्यार्थी उद्याच्या महाराष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीला चालना देण्यासाठी आपल्या वचननाम्यामध्ये जी वचने दिलेली आहेत, त्या वचनांची पुर्तता करावी, जेणेकरून या गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. आम्ही सर्व स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आपल्याकडे ही मागणी घेऊन आलो आहोत. विद्यार्थ्यांच्या न्याय प्रश्नांकडे तातडीने लक्ष घालून आपण निवडणुकीत दिलेल्या वचननाम्याची पूर्तता करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हेही वाचा - Prakash Raj Meet KCR : अभिनेते प्रकाश राज यांनी केले मुख्यमंत्री के चंद्रशेकर राव यांचे स्वागत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.