ETV Bharat / city

कोल्हापूरची पोरं 'लै भारी'; दीपावली साहित्य विक्रीच्या नफ्यातून सामाजिक उपक्रम

author img

By

Published : Oct 29, 2021, 10:43 PM IST

येत्या 4 ऑक्टोबरपासून दीपावलीला सुरुवात होत आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील सर्वच बाजारपेठा आकाशकंदील, पणत्या तसेच दीपावलीच्या साहित्यांनी सजल्या आहेत.

kolhapur
दीपावली साहित्य विक्रीच्या नफ्यातून सामाजिक उपक्रम

कोल्हापूर - येत्या 4 ऑक्टोबरपासून दीपावलीला सुरुवात होत आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील सर्वच बाजारपेठा आकाशकंदील, पणत्या तसेच दीपावलीच्या साहित्यांनी सजल्या आहेत. याच बाजारपेठांमध्ये आता काही कॉलेज युवक-युवतींनी सुरू केलेला साहित्य विक्रीचा स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. असे काय केले आहे जेणेकरून त्यांच्या स्टॉलवर मोठ्या प्रमाणात लोकं खरेदीसाठी येत आहेत. याबाबतच सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा
  • सामाजिक कार्यासाठी उभारला दीपावली साहित्य विक्रीचा स्टॉल :

'जगात भारी आम्ही कोल्हापुरी' अशी कोल्हापूरची एक वेगळी ओळख आहे. कोल्हापुरात नेहमीच विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात ज्याची संपूर्ण राज्यात चर्चा होत असते. आतासुद्धा कोल्हापुरातल्या काही महाविद्यालयीन युवक-युवतींनी एकत्र येत सामाजिक भावनेतून दीपावली साहित्य विक्रीचा स्टॉल उभा केला आहे. या सर्वच मुलांची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली आहे. मात्र, आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ही भावना ठेऊन त्यांनी हा स्टॉल उभा केला आहे. या स्टॉलच्या माध्यमातून जी काही विक्री होईल, त्याच्या नाफ्यातील रक्कमेतून हे सर्वजण गरजूंना मदत करत असतात. या उपक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंत या युवकांनी अनेकांना आर्थिक तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या माध्यमातून मदत केली आहे. त्यांच्या या उपक्रमाची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे.

  • 7 वर्षांपासून उपक्रमाला सुरुवात :

इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणारा कोल्हापुरातील तेजस कुलकर्णी याने सात वर्षांपूर्वी येथील राजारामपुरी दुसऱ्या गल्लीत छोटा स्टॉल सुरू केला होता. याच्या मागे सुद्धा एक रंजक कहाणी आहे. मात्र गेल्या सात वर्षांपासून त्यांचा हा स्टॉल इथे असतो. सुरुवातीला केवळ तिघा चौघांनी मिळून सुरू केलेला हा आगळा वेगळा उपक्रम पाहून त्याला आता 15 ते 20 मित्र मैत्रिणींनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये पुर्वील शाह, प्रत्युश दोषी आदींचा समावेश आहे. हे सर्वजण मिळून इथे दीपावलीच्या साहित्यांची विक्री करत असतात. त्यामुळे समाजात असाही काही विचार करणारी मुलं आहेत याचा प्रत्यय इथे येतो.

kolhapur
दीपावली साहित्य विक्रीच्या नफ्यातून सामाजिक उपक्रम
  • दरवर्षी हजारोंचा नफा; सर्व सामाजिक कार्यासाठी :

गतवर्षी कोरोनामुळे दिपावली सण साजरा करण्यासाठी खूपच मर्यादा होत्या. मात्र आता कोरोनाचा विळखा सुद्धा काही प्रमाणात सैल झाल्याने निर्बंध सुद्धा शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे बाजारपेठा विविध सजावटीच्या साहित्यांनी सजल्या आहेत. यातच या युवकांच्या स्टॉलला अनेकजण भेट देत असून त्यांच्याकडून वस्तू तसेच रंगीबेरंगी आकाशकंदील, पणत्या विकत घेत आहेत. सुरुवातीला एक दिवस उभा केलेल्या स्टॉलच्या माध्यमातून केवळ 500 रुपयांचा नफा झाला होता. आता तोच हजारोंच्या घरात पोहोचला आहे. यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री होईल आणि याच्या माध्यमातून जास्तीत जास्त गरजूंना मदत करता येईल अशी प्रतिक्रिया तेजस कुलकर्णी याने 'ईटीव्ही भारत'ला दिली.

हेही वाचा - Diwali 2021 : दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांची ट्रॅव्हल्स चालकांकडून लूट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.