ETV Bharat / city

Omicron Threat Kolhapur : ओमायक्रॉनचा धोका! कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज.. 500 बेडचे नियोजन

author img

By

Published : Jan 1, 2022, 10:55 PM IST

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा ( Covid Omicron Variant ) धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अचानक रुग्णसंख्या वाढल्यास रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने ( Kolhapur District Administration ) जय्यत तयारी केली ( Omicron Threat Kolhapur ) आहे. कोल्हापुरात ५०० बेडचे नियोजन करण्यात आले ( Kolhapur 500 Bed Covid ) असून, गरज पडल्यास आणखी कोविड सेंटर्स ( Covid Centers Kolhapur ) सुरु करण्यात येणार आहे.

ओमायक्रॉन
ओमायक्रॉन

कोल्हापूर : कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा ( Covid Omicron Variant ) धोका ओळखून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने ( Kolhapur District Administration ) तयारी केली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्याची सुद्धा तयारी असून, सद्यस्थितीत केवळ 40 कोरोना रुग्ण असल्याने त्यांना येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र ओमायक्रॉनचा एक रुग्ण आढळला असल्याने पुढील संभाव्य धोका ( Omicron Threat Kolhapur ) लक्षात घेता तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयासह प्रत्येक तालुक्यात एक कोविड सेंटर पुन्हा उभारली जाणार ( Covid Centers Kolhapur ) असून, त्याची सुद्धा प्रशासनाने तयारी केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.

ओमायक्रॉनचा धोका! कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज.. 500 बेडचे नियोजन
500 हुन अधिक बेडचे नियोजन

महाराष्ट्रात सध्या ओमायक्रॉनचे ( Omicron In Maharashtra ) रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे राज्य सरकारही दक्ष असून, याचा सामना करण्यासाठी वैद्यकीय सुविधाही सज्ज आहेत. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून सुद्धा याबाबत दक्षता घेतली जात असून, एकूणच आरोग्य यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. संभाव्य धोका ओळखून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात एक अशा प्रमाणे जवळपास 500 बेडचे नियोजन ( Kolhapur 500 Bed Covid ) ठेवण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कोरोनासाठी वापरण्यात आलेली सर्वच कोविड सेंटर आता ओमायक्रॉनच्या रुग्णांवरील उपचारासाठी वापरण्यात येणार आहेत. त्यासाठी त्या ठिकाणचे डॉक्टर, कर्मचारी तसेच संबंधितांनी सज्ज रहावे, अशा सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात मुबलक ऑक्सिजन

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण येथील सीपीआर रुग्णालयात ( CPR Hospital Kolhapur ) उपचार घेऊन बाहेर पडले आहेत. त्यामुळे या रुग्णालयात कोरोनाच्या दोन्ही लाटेत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज लागली. जिल्ह्यातील इतर रुग्णालये तसेच कोविड सेंटरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दररोज ऑक्सिजनची गरज भासली. त्यासाठी कोल्हापूर बाहेरून सुद्धा ऑक्सिजन मागविण्याची वेळ आली. मात्र कोरोना काळातच जिल्ह्यातील विविध रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारी यंत्रणा बसविण्यात आली असून, संभाव्य ओमायक्रोनच्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही असे जिल्हा शल्य चिकित्सक अनिल माळी यांनी म्हटले. जिल्ह्यात एकूण 17 ठिकाणी आशा प्रकारचे प्रकल्प उभे करण्यात येणार होते. त्यातील 14 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्याद्वारे 25 मेट्रिक टन इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. शिवाय 14 लिक्विड ऑक्सिजन प्लांट ( Oxygen Plants Kolhapur ) सुद्धा प्रस्तावित होते. त्यातील 7 पूर्ण झाले असून, त्याद्वारे 111 मेट्रिक टन इतक्या प्रमाणात ऑक्सिजन साठवून ठेवण्याची क्षमता निर्माण केली आहे. गतवेळी कोरोनाच्या लाटेत 52 मेट्रिक टन दररोज ऑक्सिजनची गरज होती. मात्र, सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात आपल्याकडे ऑक्सिजनची उपलब्धता असल्याचेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी म्हटले.

कोरोना नियमावलीचे पालन करा; धोका कायम

दरम्यान, कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे. नव्या व्हेरिएंटमुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. मास्कचा वापर सुद्धा महत्वाचा असून, आता तीन थरांचा मास्क किंवा N95 मास्कचा वापर करावा, असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. कापडी मास्क तसेच रुमाल वापरू नये, अशा सूचना सुद्धा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूरातील एकूण कोरोना रुग्णसंख्या लसीकरण

कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 7 हजार 14 वर पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 1 हजार 115 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण मृतांची संख्या 5 हजार 799 झाली आहे. तर सद्यस्थितीत केवळ 100 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुद्धा जिल्ह्यात वेगाने सुरू आहे. सध्या जिल्ह्यातील 69 टक्के लसीकरण झाले आहे. यामध्ये 27 लाख 76 हजार 816 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 19 लाख 29 हजार 643 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यातील लसीकरण सुद्धा लवकरच पूर्ण व्हावे याबाबत सुद्धा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.