ETV Bharat / city

शेतकर्‍यांना खलिस्तानवादी म्हणणारे अमित शहा कोण लागून गेले? निर्णय न झाल्यास केंद्राविरोधात देश पेटवू...

author img

By

Published : Dec 1, 2020, 3:04 PM IST

Updated : Dec 1, 2020, 3:28 PM IST

राजू शेट्टी म्हणाले, शेतकर्‍यांच्या आंदोलनाला 'जात' आणि 'प्रांतवाद' देण्याचा प्रयत्न केला. हे आंदोलन केवळ पंजाब व उत्तर भारतातील शेतकऱ्यांपुरते मर्यादित नाही. तर हे आंदोलन संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची निगडित आहे. न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणे हे कितपत योग्य आहे, असा सवाल शेट्टी यांनी केला.

राजू शेट्टी
राजू शेट्टी

कोल्हापूर- शेतकर्‍यांना खलिस्तानवादी म्हणणारे अमित शहा कोण लागून गेले? येत्या दोन दिवसांत दिल्लीतील शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय न झाल्यास संपूर्ण देश केंद्र सरकारच्या विरोधात पेटवून ठेवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात बोलत होते. राजू शेट्टी यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक होऊन मोठी झटापट उडाली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, की केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कृषी विधेयक आणून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. ही विधेयके मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी दिल्लीत धडक दिली आहे. मात्र या मागण्याचा विचार न करता केंद्र सरकारने त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज व अश्रूधुर व बळाचा वापर करून आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अन्य शेतकरी जखमी झाले आहे. त्याच्या निषेधार्थ व शेतकऱ्यांचा समर्थनार्थ आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आंदोलनकर्त्याना पोलिसांनी अडवले. यावेळी मोठी झटापट उडाली. मात्र याला न जुमानता केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

निर्णय न झाल्यास केंद्राविरोधात देश पेटवू

हेही वाचा-'स्वाभिमानी'चा दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा; पुतळा जाळून केले केंद्र सरकारविरोधात आंदोलन

आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर याद राखा-

राजू शेट्टी म्हणाले, शेतकर्‍यांच्या आंदोलनाला 'जात' आणि 'प्रांतवाद' देण्याचा प्रयत्न केला. हे आंदोलन केवळ पंजाब व उत्तर भारतातील शेतकऱ्यांपुरते मर्यादित नाही. तर हे आंदोलन संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची निगडित आहे. न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणे हे कितपत योग्य आहे, असा सवाल शेट्टी यांनी केला. तुम्ही जातीवादाचा मुद्दा बाहेर काढत असाल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही. पोलिसांचा दबाव टाकून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर याद राखा आमची हायात पोलिसांच्या विरोधात लढण्यासाठी गेल्याचेही यावेळी राजू शेट्टी म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या झालेल्या प्रकारामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण होते.

हेही वाचा-'ईडी, सीबीआयला सीमेवर पाठवा; पाक आणि चीन शरण येईल'

नागपुरातही स्वाभिमानीचे आंदोलन-

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद आज महाराष्ट्रातही उमटले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर रस्त्यावर उतरले. देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा पुतळा जाळून निषेध केला.

दरम्यान, नवीन तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे.

Last Updated : Dec 1, 2020, 3:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.