ETV Bharat / city

special packages for business : उद्योग, क्लस्टरला विशेष पॅकेजद्वारे व्याज माफ सवलत द्या : राजू शेट्टींची राणे यांच्याकडे मागणी

author img

By

Published : Jul 23, 2022, 12:43 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केंद्रीय सुक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची दिल्ली येथे काल भेट (Raju Shetti meet Narayan Rane )घेतली. यावेळी त्यांनी उद्योजक व क्लस्टर च्या अनेक प्रश्नांवर चर्चा केली. शिवाय देशातील उद्योगधंद्याना केंद्र सरकारकडून लॉकडाऊनच्या काळातील व्याज माफ सवलतीची घोषणा करण्यात आलेली होती. या माफीमध्ये सहकारी बॅंकाचा समावेश नसल्याने अनेक उद्योजक व क्लस्टर या सवलतीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे त्यांना (special packages for business) विशेष पॅकेज देऊन व्याज सवलतीचा लाभ (Raju Shetti demand special packages) द्यावा,अशी मागणी सुद्धा शेट्टी यांनी राणे यांच्याकडे केली.

Raju Shetty meets Narayan Rane
राजू शेट्टी यांची नारायण राणेंशी भेट

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक (Raju Shetti) राजू शेट्टी यांनी केंद्रीय सुक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची दिल्ली येथे काल भेट (Raju Shetti meet Narayan Rane) घेतली. यावेळी त्यांनी उद्योजक व क्लस्टर च्या अनेक प्रश्नांवर चर्चा केली. शिवाय देशातील उद्योगधंद्याना केंद्र सरकारकडून लॉकडाऊनच्या काळातील व्याज माफ सवलतीची घोषणा करण्यात आलेली होती. या माफीमध्ये सहकारी बॅंकाचा समावेश नसल्याने अनेक उद्योजक व क्लस्टर या सवलतीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे त्यांना (special packages for business) विशेष पॅकेज देऊन व्याज सवलतीचा लाभ (Raju Shetti demand special packages) द्यावा, अशी मागणी सुद्धा शेट्टी यांनी राणे यांच्याकडे केली.

उद्योगांना केंद्र सरकारच्या अनुदान अथवा व्याज सवलतीच्या लाभ नाही : शेट्टी म्हणाले, आर्थिक पत नसल्याच्या कारणांमुळे राष्ट्रीयकृत बॅंकाकडून अर्थसहाय्य मिळाले नाही. विशेष करून महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी बॅंकाकडून कर्ज पुरवठा करून अनेक तरूणांनी छोटे मोठे उद्योग ऊभे केलेले आहेत. लॉकडाऊनच्या काळात नवे प्रकल्प ऊभे करत असताना परप्रांतीय कामगारांचा तुटवडा , वाढलेले स्टील व सिमेंटचे दर यामुळे प्रकल्पाची किंमत वाढलेले आहेत. उद्योगांनी सहकारी बॅकेकडून अर्थसहाय्य घेतल्याने, त्यांना केंद्र सरकारच्या अनुदान अथवा व्याज सवलतीच्या योजनांचा लाभ देण्यात आलेला नाही, असेही ते म्हणाले.


लॉकडाऊनच्या काळातील व्याज सवलतीचे विशेष पॅकेज देण्याची मागणी : काही सहकारी बॅंकानी व्याजावरील व्याजाची होणारी रक्कम माफ केलेली आहे. मात्र तीही रक्कम केंद्र सरकारकडून संबंधित सहकारी बॅंकाना न मिळाल्याने, उद्योजकांवर व्याज सवलतीची टांगती तलवार ऊभी राहिली आहे. यामुळे लॉकडाऊनच्या काळात या उद्योजकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो आहे. केंद्र सरकरकडून खास बाब म्हणून लॉकडाऊनच्या काळातील व्याज सवलतीचे विशेष पॅकेज देण्याची मागणी करण्यात आली.

हेही वाचा : Government Manage Subsidy : अनुदानाचे करावे लागेल व्यवस्थापन, अन्यथा सरकारला येऊ शकतात अडचणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.