ETV Bharat / city

मनसेच नाहीतर अन्य पक्षातून शिवसेनेत इन्कमिंगसाठी अनेक जण तयार - उदय सामंत

author img

By

Published : May 21, 2022, 3:23 PM IST

येत्या काही महिन्यात महानगर पालिकेच्या निवडणुका लागणार असून ज्या महानगरपालिका क्षेत्रांत निवडणूक होणार आहेत तिथे फक्त मनसेच नाही तर आमच्या हितचिंतक पक्षांमधील ही लोक ही सेनेत येण्यास इच्छुक असून यामध्ये अनेक माजी आमदार , नगरसेवक आणि विद्यमान आमदार सुध्दा आहेत अशी माहिती सामंत यांनी दिले आहे. यामुळे येत्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना एक नंबर चा पक्ष असेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

minister uday samant on state current political situation in kolhapur
उदय सामंत

कोल्हापूर - कोरोना काळात सुरू झालेल्या ऑनलाइन परीक्षा या वर्षीपासून ऑफलाइन पद्धतीने घेणार असून शिवाजी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. काही दिवसापूर्वीच काही विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठासमोर दंडवत घालत परीक्षा ऑनलाईन व्हावी आंदोलन केले होते. मात्र, परीक्षा ऑफलाइन होणार असून विद्यार्थ्यांनी याअगोदर केलेल्या मागणीप्रमाणे विद्यार्थ्यांना पंधरा मिनिटे वाढवून देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक पेपरच्यामध्ये दोन दिवसाचा ठेवण्यात आली असून विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी तयार राहावे, असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले.

बाळासाहेब देसाई अध्यासन आलादिन कोटीचा निधी मंजूर केला असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. यावेळी त्यांनी राणा दंपत्या विषयी बोलताना जे लोकप्रतिनिधी कायदा बिघडवत त्यांनी हे शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हे लक्षात घ्यावे असे म्हटले. येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना एक नंबरचा पक्ष असेल तसेच अनेक ठिकाणी अन्य पक्षातील माजी आमदार नगरसेवक शिवसेनेत येण्यास इच्छुक असून काही आमदार देखील संपर्कात असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत.

राज्याचे कायदा व सुव्यवस्था बिघडवत आहेत त्यांनी हे शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे - राणा दाम्पत्यबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन करणे ही आमची जबाबदारी असून या निर्णयाबाबतचा अभ्यास वरिष्ठ करतील आणि त्यानंतरच यावर भाष्य करणे योग्य ठरेल. न्यालायलाने दिलेल्या निर्णयाच पालन करण आमची जबादारी आहे. मात्र काही गोष्टींचा अतिरेक होणे हे ही चुकीचं असून यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडत असेल तर लोकप्रतिनिधींना ही समजायला हवे म्हणत जे लोकप्रतिनिधी राज्याचे कायदा बिघडवत आहेत. त्यांनी हे शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हे लक्षात घ्यावे. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी अशी कृत्य करू नयेत असा सल्ला ही राणा दाम्पत्याला दिला आहे.

अन्य पक्षातून शिवसेनेत इन्कमिंग साठी अनेक जण तयार - येत्या काही महिन्यात महानगर पालिकेच्या निवडणुका लागणार असून ज्या महानगरपालिका क्षेत्रांत निवडणूक होणार आहेत तिथे फक्त मनसेच नाही तर आमच्या हितचिंतक पक्षांमधील ही लोक ही सेनेत येण्यास इच्छुक असून यामध्ये अनेक माजी आमदार , नगरसेवक आणि विद्यमान आमदार सुध्दा आहेत अशी माहिती सामंत यांनी दिले आहे. यामुळे येत्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना एक नंबर चा पक्ष असेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच कोल्हापुरात महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन लढ्यच की स्वतंत्र याचा निर्णय शिवसेना प्रमुख घेतील आणि जे निर्णय घेतील तो आम्हास बंधनकारक असल्याचे ही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.