ETV Bharat / city

भाषातज्ज्ञ गणेश देवींची राजू शेट्टींशी भेट; म्हणाले...

author img

By

Published : Sep 24, 2020, 7:30 PM IST

राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष भाषातज्ज्ञ गणेश देवी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांची आज शिरोळ निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी देशामध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार, मच्छीमार या सर्वांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एकत्रित पणे लढा उभा करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. शेट्टी यांनी हा लढा देशभर उभा करण्याची भूमिका मांडली.

भाषातज्ज्ञ गणेश देवींची राजू शेट्टींशी भेट
भाषातज्ज्ञ गणेश देवींची राजू शेट्टींशी भेट

कोल्हापूर - राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष भाषातज्ज्ञ गणेश देवी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांची आज शिरोळ निवासस्थानी भेट घेतली. गणेश देवी देशातील अनेकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करत आहेत. आता दक्षिण भारतातील चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी शेट्टींची भेट घेतली.

महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करून देशामध्ये मजबूत चळवळ उभी केली. याच दिवसाचे औचित्य साधून राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष गणेश देवी यांनी दक्षिण भारतातील शेतकरी व डाव्या विचारसरणीच्या लोकांची भेटी घेत आहेत. आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी राजू शेट्टी यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. त्यांनी देशामध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार, मच्छीमार या सर्वांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एकत्रित पणे लढा उभा करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा - कुरकुंभ औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पाटस येथे फुटली

या वेळी, शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरच देशातील २६० शेतकरी संघटनांचे नेतृत्व करणाऱ्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या सहकार्याने हा लढा देशभर उभा करण्याची भूमिका मांडली. यावेळी गणेश देवी यांनी राष्ट्र सेवा दलाच्यावतीने लवकरच सर्व घटकांना एकत्रित आणण्यासाठी कार्यक्रमाची आखणी करून पुढील दिशा ठरविणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा - कृषी विधेयक केंद्रात मंजूर झाल्याने तीन दिवस पंजाब बंदची हाक, रेल्वे रद्द आणि मार्ग बदलले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.