ETV Bharat / city

Kolhapur North By Election Counting : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या जागेसाठी उद्या मतमोजणी, सकाळी 8 वाजता होणार सुरूवात

author img

By

Published : Apr 15, 2022, 7:33 PM IST

दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या ( Chandrakant Jadhav Death ) निधनानंतर रिक्त झालेली कोल्हापूर उत्तर विधानसभेची ( Kolhapur North Election ) जागा कोणाला मिळणार, हे उद्या कळणार आहे. या जागेसाठी 12 एप्रिल रोजी मतदान ( Election For Kolhapur North ) प्रक्रिया पार पडली असून मतदारांनी मोठ्या चुरशीने मतदान करत 15 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद केले आहे. उद्या सकाळी 8 वाजता राजाराम तलावाशेजारील जलसंपदा विभागाच्या गोदामात ( Kolhapur North Election Counting ) मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.

Chandrakant Jadhav Death
Chandrakant Jadhav Death

कोल्हापूर - दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या ( Chandrakant Jadhav Death ) निधनानंतर रिक्त झालेली कोल्हापूर उत्तर विधानसभेची ( Kolhapur North Election ) जागा कोणाला मिळणार, हे उद्या कळणार आहे. या जागेसाठी 12 एप्रिल रोजी मतदान ( Election For Kolhapur North ) प्रक्रिया पार पडली असून मतदारांनी मोठ्या चुरशीने मतदान करत 15 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद केले आहे. उद्या सकाळी 8 वाजता राजाराम तलावाशेजारील जलसंपदा विभागाच्या गोदामात ( Kolhapur North Election Counting ) मतमोजणीस प्रारंभ होणार असून दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील, असे नियोजन निवडणूक आयोगाच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त येथे तैनात करण्यात आले आहे. मतमोजणीसाठी टेबलवर 45 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह राखीव आणि अन्य असे एकूण 125 कर्मचारी नियुक्त केले आहेत. उद्या सकाळी 8 वाजता सुरुवातीला टपाली मतदानची मोजणी होणार असून त्यानंतर 14 टेबलांवर ईव्हीएमवरील मतांची मोजणी होणार आहे तसेच मतमोजणीच्या एकूण 26 फेर्‍या होणार आहेत.

दोन्ही पाटलांची प्रतिष्ठा पणाला - कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यासह एकूण 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यांच्यासाठी 12 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडले. मतदारांनी मोठ्या चुरशीने मतदान केले असून एकूण 61.19 टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीत एकूण 15 उमेदवार जरी रिंगणात असले, तरी मुख्य लढत ही काँग्रेसचे उमेदवार जयश्री जाधव आणि भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांच्यात होत आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. दरम्यान उद्या १६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता कोल्हापुरातील राजाराम तलाव येथील जलसंपदा विभागाच्या गोदामात मतमोजणी होणार आहे.

अशी आहे तयारी - कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल निवडणूक आयोगाकडून लावण्यात आले असून या टेबलवर 45 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रथम सकाळी ८ वाजता टपाली मतदान मोजण्यास सुरुवात होणार आहे. टपाली मतदान मोजणी प्रक्रिया पूर्ण होताच ईव्हीएमवरील मतांची मोजणी सुरू होणार असून मतमोजणीच्या एकूण 26 फेर्‍या होतील. तसेच राखीव आणि अन्य असे एकूण 125 कर्मचारी याठिकाणी नियुक्त केले असून या सर्वांवर निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांचीदेखील करडी नजर असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तदेखील येथे तैनात करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्र असल्या शिवाय अन्य कोणाला ही येथे प्रवेश दिला जात नाही.

हेही वाचा - Rape Rate In Mumbai Increased : मुंबईत बलात्काराचे प्रमाण वाढले.. एका वर्षात 890 गुन्ह्यांची नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.