ETV Bharat / city

Minister Deepak Kesarkar : चिन्ह गोठवण्याचा निर्णय दोघांसाठी धक्का नाही, 70 टक्के बहुमत असल्याने न्यायालयात दाद मागणार - दीपक केसरकर

author img

By

Published : Oct 9, 2022, 6:47 AM IST

निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला हा दोघांसाठी धक्का म्हणता येणार (Election Commission decision on Shiv Sena symbol नाही). आमच्याकडे बहुमत आहे, त्यामुळे आम्ही शिवसेनेवर दावा करू शकतो. त्यासाठी न्यायालयात दाद मागू शकतो. धनुष्यबाण आमचाच आहे, याचे पुरावे आम्ही देऊ शकतो. अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत (Deepak Kesarkar reaction on Election Commission) होते.

Minister Deepak Kesarkar
शिक्षणमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर : निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला हा दोघांसाठी धक्का म्हणता येणार (Election Commission decision on Shiv Sena symbol नाही). आमच्याकडे बहुमत आहे, त्यामुळे आम्ही शिवसेनेवर दावा करू शकतो. त्यासाठी न्यायालयात दाद मागू शकतो. धनुष्यबाण आमचाच आहे, याचे पुरावे आम्ही देऊ शकतो. अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत (Deepak Kesarkar reaction on Election Commission) होते.

प्रतिक्रिया देताना दीपक केसरकर, शिक्षणमंत्री, शिंदे गट प्रवक्ते


ओळखपत्राबाबत निर्णय निवडणूक आयोगाचा - यावेळी भाजप आणि शिंदे गट अशी मिळून आमची युती आहे. या युतीच्या माध्यमातूनच आम्ही निवडणूक लढवू शकतो. शिवसेना आमचीच आहे, याबाबत आम्ही दावा करू शकतो. लोकांनी आम्हाला पसंती दिलेली आहे. त्यामुळे भाजप आणि आमची युती ही अभेद असल्याचेही केसरकर यांनी म्हंटले. यावेळी बोगस ओळखपत्र बाबत बोलताना ते म्हणाले, बोगस ओळखपत्र जप्त करण्यात आले आहेत. हा प्रकार धक्कादायक आहे. निवडणूक आयोग त्यावर निर्णय घेईल, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान आम्ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे शिवसैनिक आहोत. 70 टक्क्यांपेक्षा जास्त बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे विचारांचे वारसदार आम्हीच आहोत, अशीही दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया (Minister Deepak Kesarkar) दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.