ETV Bharat / city

Nectar Anniversary of Country Independence : "हर घर तिरंगा" उपक्रम राबविताना अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घ्या - जिल्हाधिकारी राहुल रेखावार

author img

By

Published : Jul 9, 2022, 6:59 AM IST

देशाला स्वातंत्र्य ( India independence ) मिळून 75 वर्ष पूर्ण होत ( Complet 75 Years of Independence )आहेत. त्याच अमृत महोत्सवी वर्षाच्या ( Nectar Jubilee Year of Independence ) पार्श्वभूमीवर आता "आझादी का अमृत महोत्सव" ( The nectar festival of independence ) अंतर्गत "हर घर तिरंगा" उपक्रम 11 ते 17 ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व शासकीय, निम शासकीय, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थांच्या इमारती येथे हा उपक्रम राबवायचा आहे. त्याचबरोबर सर्व नागरिकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याकरिता जनजागृती करण्याचे आदेश कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे राहुल रेखावार ( Collector Rahul Rekhawar ) यांनी दिले आहेत.

Collectorate Kolhapur
जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर

कोल्हापूर : 'आझादी का अमृत महोत्सव' ( Nectar Jubilee Year of Independence ) अंतर्गत 'हर घर तिरंगा' उपक्रम 11 ते 17 ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व शासकीय, निम शासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थांच्या इमारती व प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या घरावर तिरंगा लावायचा असून, या उपक्रमात जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार ( Collector Rahul Rekhawar ) यांनी केल्या. ( The nectar festival of independence )

Collectorate Kolhapur
Collectorate Kolhapur

जनजागृती करण्याचे आदेश : 'हर घर तिरंगा' व अन्य उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, 'हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत सर्व संस्था, कार्यालयांच्या इमारतींवर तसेच प्रत्येक नागरिक आपापल्या घरावर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज उभारण्यासाठी जनजागृती करा.

उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन : स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा, महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत यंत्रणांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी करूया, असे आवाहन त्यांनी केले.


उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांच्या नोंदी घ्या : यावेळी रेखावार म्हणाले, या उपक्रमात सहभागी होणाऱ्या व्यक्तींची नोंद घ्या. राष्ट्रध्वज मुबलक उपलब्ध होईल, याची खात्री करा. विक्री केंद्र उपलब्ध करून देण्याबरोबरच या केंद्रांना ध्वजाचा आकार व अन्य अनुषंगिक बाबींच्या सूचना द्या. भारतीय ध्वजसंहितेचे पालन व्हावे व अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांमध्ये जाणीव जागृती करा.

तिरंगा स्वच्छेने विकत घेण्यासाठी प्रेरित करा : देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने त्याबाबतची जनजागृती करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच, याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारीदेखील अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. नागरिकांनी तिरंगा स्वेच्छेने विकत घेण्यासाठी लोकांना प्रेरित करा, तसेच या उपक्रमाची रुची निर्माण करण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.



हेही वाचा : Cloudburst In Amarnath Cave Area: अमरनाथ गुहा परिसरात ढगफुटीमुळे 15 यात्रेकरू ठार, 40 बेपत्ता

हेही वाचा : Chhagan Bhujbal : 'बाळासाहेब ठाकरे व आमच्यात भांडण होत, पण...'; भुजबळांचे बंडखोर आमदारांना प्रत्तुत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.