ETV Bharat / city

Chandrakant Patil on Presidents Rule : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य, म्हणाले..

author img

By

Published : Dec 20, 2021, 8:24 PM IST

Updated : Dec 20, 2021, 8:33 PM IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Union Minister Amit Shah) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवल्यानंतर महाआघाडीच्या नेत्यांकडून अमित शाहांना आता जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. अशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रपती राजवटीबाबत (Chandrakant Patil on Presidents Rule) एक वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडी सरकारने राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची काहीच कारणे शिल्लक ठेवली नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

chandrakant patil
chandrakant patil

कोल्हापूर - राष्ट्रपती राजवट लागण्यासाठी ( Chandrakant Patil on Presidents Rule) जी कारणे लागतात त्यासाठीची कोणतीच कारणं राज्य सरकारने शिल्लक ठेवलेली नाहीत. राज्यपालांनी याबाबत जे होतंय ते होऊ दे म्हणून बाजू काढली आहे. मात्र हे सरकार राज्यपालांचे अधिकार कमी करत सुटले आहे, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, राज्यपाल आणि सरकार यांच्यामधील वादाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा समोर आला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील -
महाविकास आघाडीच्या लक्षात आणून दिले पाहिजे की, कुठल्याही राज्याचे कॉन्स्टिट्यूशन हेड हे राज्यपाल असतात. राज्याच्या न्यायाधीशांना सुद्धा त्यांच्याकडून शपथ घ्यावी लागते. तसेच मुख्यमंत्र्यांना (chandrakant patil on CM Uddhav Thackeray) सुद्धा त्यांच्याकडून शपथ घ्यावी लागते. मात्र या सरकारने अनेक गोष्टीत त्यांचे अधिकार काढून घेतले आहेत. अशी अनेक गोष्टींची लिस्ट आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट आणण्याच्या सगळ्या गोष्टी रांगेने लिहिल्या गेल्या आहेत. राज्यपालांनी निरोप पाठवला तर तो तुम्ही घटनेचा अपमान करता. राज्यपालांनी आत्तापर्यंत राष्ट्रपती राजवटीबाबत ( Chandrakant Patil on Presidents Rule) अध्याप काही बोलले नाही म्हणजे त्यांनी सुद्धा ठीक आहे, जे चाललंय चालू राहु देत असेच वाटत असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
कोणते उद्योग गुजरातमध्ये गेले ?
पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, कोणते उद्योग गुजरातमध्ये गेले याची सुभाष देसाई यांनी माहिती द्यावी. शिवाय काही गेले असतील तर त्याची कारणं वेगळी असतील असेही ते म्हणाले. आज सुभाष देसाई यांनी केंद्र आणि गुजरातकडून महाराष्ट्राचे वैभव, उद्योग (Chandrakant Patil on CM Uddhav Thackeray ) पळविण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप केला. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी कोणते उद्योग गेले याची माहिती द्यावी, असे आव्हान दिले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्व गटात भाजपचे उमेदवार -
दरम्यान जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्व 9 गटांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बिनविरोध निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दोन जागा मिळाल्या शिवाय भाजप आपले उमेदवार मागे घेणार नाही असेही म्हणत चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आपणही तयार असल्याचे म्हटले.
Last Updated : Dec 20, 2021, 8:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.