ETV Bharat / city

Gunaratna Sadavarte Case Kolhapur : मुंबई, सातारानंतर आता कोल्हापुरातही सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल

author img

By

Published : Apr 15, 2022, 8:43 PM IST

Updated : Apr 15, 2022, 9:01 PM IST

मुंबई, सातारानंतर कोल्हापुरातही त्यांच्यावर गुन्हा नोंद ( Case recorded against Gunaratna Sadavarte in Kolhapur ) करण्यात आला आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल तसेच एकोप्याला बाधा येईल, अशी कृती केल्या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात ( Shahupuri Police Station ) सदावर्ते विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शाहूपुरी पोलीस
शाहूपुरी पोलीस

कोल्हापूर - खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी आणि छत्रपतींच्या वारसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte arrested ) हे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. अशातच त्यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. मुंबई, सातारानंतर कोल्हापुरातही त्यांच्यावर गुन्हा नोंद ( Case register against Gunaratna Sadavarte in Kolhapur ) करण्यात आला आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल तसेच एकोप्याला बाधा येईल, अशी कृती केल्या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात ( Shahupuri Police Station ) सदावर्ते विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील ( Complaint of Dilip Patil of Maratha Kranti Morcha ) यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात लेखी तक्रार नोंद केली होती. त्यानुसार या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दिलीप पाटील - मराठा क्रांती मोर्चा

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा नोंद : मराठा आरक्षणाला विरोध करणारे तसेच मराठा समाज आणि मागासवर्गीय समाज यांच्याविषयी चिथावणीखोर वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची लेखी तक्रार मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक दिलीप पाटील यांनी 3 दिवसापूर्वी शाहूपुरी पोलिसांत दिली होती होती. तसेच गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली होती. तर पोलिसांनी संबंधित तक्रार अर्जावर अभ्यास करून सदावर्ते यांच्यावर आज (शुक्रवारी) सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आता मुंबई, सातारा नंतर कोल्हापुरातही सदावर्ते विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.


'या' कारणामुळे झाला गुन्हा नोंद : गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्या जातील हे माहित असताना जाणीवपूर्वक दिनांक 05 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा संदर्भात दिलेल्या निर्णयानंतर माध्यमांशी बोलताना दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. असा आरोप दिलीप पाटील यांनी केला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाज व मागासवर्गीय समाजामध्ये वाद होऊन दंगे घडावी, अशी चिथावणीखोर भडकाऊ वक्तव्य केले होते. त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची लेखी तक्रार दिलीप पाटील यांनी शाहूपुरी पोलिसात दिली होती. तसेच याचे व्हिडीओ क्लिप देखील पेनड्राईवच्या माध्यमातून पोलिसांकडे सादर केले होते. यावरुन हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा - Silver Oak Attack Case : सदावर्तेंच्या अटकेनंतर आता जयश्री पाटील नॉटरिचेबल.. पोलिसांकडून शोध सुरु

Last Updated : Apr 15, 2022, 9:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.