ETV Bharat / city

Ukraine Russia War : रशिया-युक्रेन युद्धाचे काय परिणाम होतील? लेफ्टनंट कर्नल ढगेंशी खास बातचीत

author img

By

Published : Mar 6, 2022, 8:52 AM IST

Updated : Mar 6, 2022, 9:25 AM IST

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे जागतिक पातळीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः इंधनाचे दर वाढणार असून त्यासोबत गाडीला लागणाऱ्या चिपसह इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग होण्याची शक्यता असल्याचे मत माजी लष्कर अधिकारी आणि आंतराष्ट्रीय अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले आहे. ते 'ईटीव्ही भारत'शी बोलत होते.

रशिया-युक्रेन युद्धाचे काय परिणाम होतील? लेफ्टनंट कर्नल ढगेंशी खास बातचीत
रशिया-युक्रेन युद्धाचे काय परिणाम होतील? लेफ्टनंट कर्नल ढगेंशी खास बातचीत

औरंगाबाद - रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे जागतिक पातळीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः इंधनाचे दर वाढणार असून त्यासोबत गाडीला लागणाऱ्या चिपसह इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग होण्याची शक्यता असल्याचे मत माजी लष्कर अधिकारी आणि आंतराष्ट्रीय अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले आहे. लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांच्याशी आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी बातचीत केली आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचे काय परिणाम होतील? लेफ्टनंट कर्नल ढगेंशी खास बातचीत

भारताला भूमिका घेण्यास झाला विलंब

रशियाने केलेल्या आक्रमणानंतर भारताला आपली भूमिका घेण्यास विलंब झाला आहे. महासत्ता होण्यासाठी भारताने आधीच योग्य भूमिका घेऊन जर मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता, तर निश्चितच जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा ही उंचावली असते. मात्र, आपण कोणाच्याही बाजूने न जाता तटस्थ भूमिका घेतल्यामुळे आपली भूमिका मांडण्यास विलंब झाला आहे. इतर देशांनी युद्धाची शक्यता लक्षात घेता, आपल्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना युक्रेनमधून तातडीने मायदेशी हालवले आहे. त्यातही भारताने ऑपरेशन गंगा सुरू करण्यास उशीर केला. त्यामुळे आज अनेक विद्यार्थी आणि नागरिक तिथे अडकून आहेत. असे मत लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले.

चायनाचा फायदा होण्याची शक्यता

चीन आणि रशियाचे संबंध चांगले नव्हते. मात्र, रशियाने आक्रमण केल्यावर चीनने घेतलेली भूमिका लक्षात घेता, हे संबंध सुधारण्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिका आणि चीन यांचे संबंध तसे चांगले नसल्याने चीनने रशियाला साथ दिली. त्यामुळे आगामी काळात रशियाकडून काही प्रमाणात व्यापारी धोरण सुधारण्यास मदत होईल. त्यात आता अमेरिकेचे लक्ष युक्रेनकडे असल्यांने चीन त्याचा फायदा घेऊन इतर राष्ट्रांवर हल्ला करू शकतो. असे मत लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले आहे.

विद्यार्थ्यांचे होणार नुकसान

युक्रेन आणि रशियामध्ये वैद्यकीय पदवी मिळवण्यासाठी भारतीय विद्यार्थी दरवर्षी मोठ्या प्रमाणात जात असतात. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या विद्यार्थ्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांना इंटरशिपसाठी भारतात परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांचे अद्यापही शिक्षण सुरू आहे त्यांना मात्र पुन्हा जाण्यास अनेक अडचणी असणार आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांचे पालक आता त्यांना युक्रेनमध्ये पाठवण्यास तयार नसतील. त्यांच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली आहे. त्यातही युक्रेनचा युद्ध संपले तरी त्याचे परिणाम पुढील काही वर्षे असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतील असे मत लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - Disha Salian Case : मालवणी पोलिसांकडून राणे पिता-पुत्रांची 9 तास चौकशी; अखेर अमित शहांना केला फोन

Last Updated : Mar 6, 2022, 9:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.