ETV Bharat / city

Aurangabad Power Theft : टाचण पिन लाऊन तीन लाखांची वीज चोरी, सिडको पोलिसात गुन्हा दाखल

author img

By

Published : Dec 23, 2021, 1:56 PM IST

Updated : Dec 23, 2021, 3:55 PM IST

औरंगाबाद परिसरातील मीटरमध्ये अनेक प्रकारे बिघाड करून वीजचोरी ( Power theft In Aurangabad ) केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, एकाने टाचण-पिनचा वापर करून वीजचोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये तब्बल तीन लाखांची वीजचोरी केली आहे. या प्रकरणी सिडको पोलिसात वीजचोरी करणाऱ्या उद्योजकावर गुन्हा ( Aurangabad Police Cracks Power Theft ) दाखल करण्यात आला आहे.

Power theft
वीजचोरी

औरंगाबाद: शहर परिसरात मीटरमध्ये अनेक प्रकारे बिघाड करून वीजचोरी ( Aurangabad Power theft ) केल्याच्या घटना समोर आल्या. आता टाचण-पिनचा वापर करून वीजचोरी ( Power Theft Using Heel Pin ) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वीजचोरी करणाऱ्या उद्योजकावर विद्युत कायदा-2003 च्या कलम 135 नुसार सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्योजकाने केली वीज चोरी -

नारेगाव येथे सिसोदिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये हिलाबी इंजिनिअरिंग वर्क्स या प्लास्टिक बॉटलच्या कारखान्यात वीजचोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. कारखान्यात स्क्रोल बटनवर टाचण पिन खोचून स्क्रोल बटन दाबून ठेवण्यात आले होते. स्क्रोल बटन जोपर्यंत दबलेले आहे, तोपर्यंत मीटरचा डिस्प्ले गायब राहायचा. त्यामुळे वीजवापराची मीटरमध्ये नोंद होत नव्हती. हे महावितरणच्या (MSEDCL) प्रयोगशाळेतच्या मीटरची तपासणी करण्यात आल्यावर समजले. त्यामुळे आता महावितरणने मीटर वापरकर्ता हनुमान मुंडे याच्या नावाने 25 हजार 200 युनिट्सची वीजचोरी केल्याचे 2 लाख 99 हजार 458 रुपयांचे वीजबिल (Electricity bill) दिले आहे. तसेच हे बिल न भरल्यामुळे सहायक अभियंता श्याम मोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी हनुमान मुंडे याच्याविरोधात विद्युत कायदा-2003 च्या कलम 135 (Section 135 of Electricity Act-2003) नुसार सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी केली जात होती वीजचोरी -

याबाबत मिळालेला माहिती अशी की, चिकलठाणा एमआयडीसी महावितरणच्या शाखेचे प्रधान तंत्रज्ञ सतीश दिवे हे वीजबिल वसुलीसाठी या कारखान्यात गेले होते. त्यावेळी वीज मीटरमधील डिस्प्ले (Meter Display) गायब असल्याचे आढळून आले. त्यामुळे दिवे यांनी सहायक अभियंता श्याम मोरे यांना मोबाईलवर संपर्क साधून मीटरमध्ये गडबड असल्याचा प्रकार सांगितला. त्यानंतर मोरे यांनी दिवे, तंत्रज्ञ विनोद सावळे, शंकर कड, इतर कंत्राटी कर्मचारी व दोन पंचांना सोबत घेऊन कारखान्यास भेट देऊन मीटरची बारकाईने पाहणी केली. त्यात स्क्रोल बटनवर टाच पिन (Heel pin)खोचून स्क्रोल बटन दाबून ठेवण्यात आले असल्याचे आढळले. ज्यामध्ये असे दिसून आले की स्क्रोल बटन जोपर्यंत दबलेले आहे, तोपर्यंत डिस्प्ले गायब राहायचा. त्यामुळे वीजवापराची मीटरमध्ये नोंद होत नव्हती. अशा प्रकारे वीज चोरी झाल्याचे उघड झाले आहे.

तब्बल तीन लाखांची वीजचोरी -

महावितरणच्या प्रयोगशाळेत मीटरची तपासणी करण्यात आली. त्यात मीटर मध्ये बिघाड करून वीजचोरी होत असल्याचे समोर आले. त्यावर महावितरणने मीटर वापरकर्ता हनुमान मुंडे याच्या नावाने 25 हजार 200 युनिट्सची वीजचोरी केल्याचे 2 लाख 99 हजार 458 रुपयांचे वीजबिल दिले. मात्र हे बिल न भरल्यामुळे सहायक अभियंता श्याम मोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी हनुमान मुंडे याच्याविरोधात विद्युत कायदा-2003 च्या कलम 135 नुसार सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Last Updated : Dec 23, 2021, 3:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.