ETV Bharat / city

वाळूज परिसरात अट्टल गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून, घटनेला गँगवाॅरची किनार

author img

By

Published : May 22, 2021, 1:39 PM IST

विशाल ऊर्फ मड्ड्या किशोर फाटे या २७ वर्षीय सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून केल्याची खळबळजनक घटना बजाजनगर येथे घडली.

दगडाने ठेचून खून
दगडाने ठेचून खून

औरंगाबाद- वाळूज परिसरात वडगाव बजाजनगर येथे २७ वर्षीय सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून केल्याची खळबळजनक घटना बजाजनगर येथे घडली. या घटनेमुळे वाळूज परिसरात खळबळ उडाली आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, विशाल ऊर्फ मड्ड्या किशोर फाटे (रा. वडगाव) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. मड्ड्या हा वडगावामध्ये गतवर्षी घडलेल्या योगेश प्रधान या तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपी आहे. बजाजनगरमधील हॉटेल मृगनयनी समोर शुक्रवारी रात्री एका तरुणास दोन अनोळखी व्यक्ती मारहाण करीत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, यावेळी एक अनोळखी तरुण रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी बेशुद्ध पडलेला असल्याचे, तसेच दगडाने ठेचल्याने चेहऱ्याला गंभीर मार लागल्याच्या स्थितीत आढळून आला. यावेळी पोलिसांनी जखमीला दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

मड्ड्या हा सराईत गुन्हेगार
बजाजनगर येथे दगडाने ठेचून खून केलेल्या तरुणाची ओळख पटली असून, त्याचे नाव विशाल ऊर्फ मड्ड्या किशोर फाटे ( वय- २७, वडगाव कोल्हाटी) असे आहे. मयत विशाल हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात जवळपास गंभीर स्वरूपाचे ७ ते ८ गुन्हे दाखल आहेत. गतवर्षी वडगाव येथील योगेश प्रधान या तरुणाच्या खून प्रकरणातही विशालचा सहभाग होता. या खून प्रकरणात विशाल हा वर्षभर हर्सुल कारागृहात होता. पंधरा दिवसांपूर्वीच विशाल याची जामिनावर सुटका झाल्याने तो घरी परतला होता.

हेही वाचा-हा तर समुद्रातील मनुष्यवध, बार्ज दुर्घटनेवरून सामनातून केंद्रावर निशाणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.