ETV Bharat / city

Special Pet Salon : काय म्हणता! श्वानासाठी सलून; अंघोळ, कटिंगचीही सुविधा

author img

By

Published : Jun 18, 2022, 5:31 PM IST

Updated : Jun 18, 2022, 7:20 PM IST

गरखेडा भागातील सलून सध्या चांगलंच चर्चेत आहे. तिथे येणारे ग्राहक येत असताना रस्त्यात कोणी उभे राहत नाही सगळे बाजूला सरकतात. आता प्रश्न पडेल सलूनमध्ये येणाऱ्याला कोण घाबरले. तर त्याच उत्तर म्हणजे हे ग्राहक माणूस नसून पाळीव श्वान ( Pet dogs) आहेत. इथे श्वानासाठी,अंघोळ ( dog bath ) , कटिंगची ( cutting facilities ) विशेष ( Special facilities for caring dogs salon) व्यवस्था केलेली आहे. वाढलेले केस काढणे अशा सुविधा या सलूनमध्ये ( Special facilities for salon) ) दिल्या जात आहेत.

The salon makes it easy to take care of dogs
सलूनमुळे श्वानांची काळजी घेणे झाले सोपे

औरंगाबाद - गरखेडा भागातील सलून सध्या चांगलंच चर्चेत आहे. तिथे येणारे ग्राहक येत असताना रस्त्यात कोणी उभे राहत नाही सगळे बाजूला सरकतात. आता प्रश्न पडेल सलूनमध्ये येणाऱ्याला कोण घाबरले. तर त्याच उत्तर म्हणजे हे ग्राहक माणूस नसून पाळीव श्वान ( Pet dogs) आहेत. इथे श्वानासाठी,अंघोळ ( dog bath ) , कटिंगची ( cutting facilities ) विशेष ( Special facilities for caring dogs salon) व्यवस्था केलेली आहे. वाढलेले केस काढणे अशा सुविधा या सलूनमध्ये ( Special facilities for salon) ) दिल्या जात आहेत.

श्वानासाठी सलून

अत्याधुनिक सलून - गारखेडा भागात असलेले सलून चर्चेत आहे. रोज या सलूनमध्ये कधी चांगल्या कारमधून तर कधी दुचाकीवर, तर कधी पायी श्वानप्रेमी आपले श्वान घेऊन येत असतात. या सलूनमध्ये श्वानांची काळजी ( Special facilities for caring dogs ) घेण्यासाठी विशेष सोय केली गेली आहे. श्वानांची काळजी घेताना त्याची स्वच्छता महत्वाची असते. मात्र, अनेकांना ते शक्य होत नाही. अशा श्वान प्रेमींसाठी तशी व्यवस्था करण्यात आली आहे. इथे मोठा टब ठेवण्यात आला आहे. त्यात पाण्याची व्यवस्था, विशेष शॅम्पू श्वानासाठी ठेवण्यात आले आहे. इथे श्वानांना प्रेमाने काळजी अंघोळ घातली जाते. नंतर ड्रायरने केस सुखावले जातात. त्याचे वाढलेले केस काढले जातात. त्यांची वाढलेली नख देखील काढली जातात. केस काढल्यावर विशेष पावडर लावून त्यांना होणारा त्रास दूर केला जातो. त्यासाठी काही साहित्य तयार करून तर, काही साहित्य बाहेरून मागावल्याची माहिती सलून चालक जयंत कुलकर्णी यांनी दिली.


सलूनमुळे श्वानांची काळजी घेणे झाले सोपे -
श्वान घरात सांभाळताना अनेक अडचणी येतात. सतत घरात वावर असल्याने त्याचे केस घरभर पसरतात. स्वच्छता करायची म्हणले तर, वेळ नसतो. वेळ भेटला तरी दोन ते तीन जणांची गरज लागते. त्यामुळे श्वान सांभाळताना अनेक वेळा त्रास होतो. कधीकधी तर, श्वान सांभाळण्याची इच्छा देखील होत नाही. मात्र, सलून सुरू झाल्याने आता वेळ मिळाल्यावर श्वानाला आणले की सर्व सुविधा मिळतात. त्यामुळे दिलासा मिळाल्याचं ग्राहकांनी सांगितलं.

हेही वाचा - Anti Agnipath Protest : अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात उद्रेक, ठिकठिकाणी जाळपोळ, तोडफोड आंदोलने

हेही वाचा - Santosh Jadhav on social media : संतोष जाधवच्या फॅन फॉलोविंगमध्ये चांगल्या घरची मुले, पोलीस पालकांचे करणार समुपदेशन

Last Updated : Jun 18, 2022, 7:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.