ETV Bharat / city

धार्मिक तेढ निर्माण करणारा व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या यूट्यूबच्या अँकरसह संपादकाला अटक

author img

By

Published : Apr 23, 2022, 9:24 PM IST

आरोपींना गुन्ह्यासाठी कोणत्‍या समाजविरोधी संघटना अथवा गटाने वित्तीय मदत केली, तसेच आरोपीने सुरु केलेल्या युट्यूब चॅनलसाठी परवानगी घेतली आहे काय, याचा देखील तपास करायचा आहे. आरोपींनी गुन्‍ह्यात वापरलेले संगणक, कॅमेरा जप्‍त करायचा आहे. आरोपींनी अशा प्रकारे आणखी काही गुन्‍हे केले आहेत काय याचा तपास बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली. यावरदोघा आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी शनिवारी दिले.

creating a religious rift editor arrested with youtube anchor for broadcasting video
धार्मिक तेढ निर्माण करणारा व्हिडीओ प्रसारित करणाऱ्या यूट्यूबच्या अँकरसह संपादकाला अटक

औरंगाबाद - सोशल मिडीयावर धार्मिक-जातीय तेढ निर्माण करुन सार्वजनिक शांतता भंग व्हावी या उद्देशाने व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने तहफुज -ए- दिन इंडिया या युट्युब चॅनेल मालक व अँकरला शुक्रवारी दि.२२ सायंकाळी अटक केली. दोन्ही आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी शनिवारी दि.२३ एप्रिलला दिले.

सायबर पोलीस ठाण्याची कारवाई - जीयाउर रहमान महफुजुर रहमान फारुकी (३७, रा. भडकलगेट, टाऊन हॉल) असे मालक तर सय्यद फारुख अहेमद (३६, रा. सादातनगर, रेल्वे स्‍टेशन) असे अटक करण्‍यात आलेल्‍या अँकरचे नाव आहे. सायबर पोलीस ठाण्याच्या सोशल मीडिया सेलचे उपनिरीक्षक राहुल चव्हाण हे २१ एप्रिलला सोशल मीडिया पेट्रोलींगचे कामकाज करत असताना, त्यांना व्हॉटस्अप वर एक व्हिडिओ निदर्शनास आला. मुस्लीम समाजातील लोकांना इतर समाजापासून धोका असल्याचे दाखवून दोन समाजात तेढ निर्माण करण्‍याच्‍या प्रयत्‍नात असणारा हा व्हिडिओ होता. तो व्हिडिओ तहफुज -ए- दिन इंडिया या युटयुब चॅनलचे अँकर सय्यद फारुक अहमद याने तयार करुन युट्युब चॅनलचे मालक कारी झियाउर महफुजुर रहमान फारुकी यांच्या संगनमताने १५ एप्रिलला रात्री दहाच्या सुमारास वेगवेगळया सोशल मीडियावर प्रसारीत केला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्‍याचे सहायक निरीक्षक राहुल चव्‍हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चॅनलचा अँकर व मालक यांच्याविरुध्द १५३ (अ), ५०५ (ब), ५०५ (क) व ३४ प्रमाणे बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडिओ प्रसारित करण्‍यामागे नेमका उद्देश काय यासाठी पोलीस कोठडीची विनंती - आरोपींना शनिवार दि.२३ एप्रिला न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी व्हिडिओ प्रसारित करण्‍यामागे आरोपींना कोणी पाठबळ देत आहे काय याच तपास करायचा आहे. हा व्हिडिओ प्रसारित करण्‍यामागे नेमका उद्देश काय होता. आरोपींना गुन्ह्यासाठी कोणत्‍या समाजविरोधी संघटना अथवा गटाने वित्तीय मदत केली, तसेच आरोपीने सुरु केलेल्या युट्यूब चॅनलसाठी परवानगी घेतली आहे काय, याचा देखील तपास करायचा आहे. आरोपींनी गुन्‍ह्यात वापरलेले संगणक, कॅमेरा जप्‍त करायचा आहे. आरोपींनी अशा प्रकारे आणखी काही गुन्‍हे केले आहेत काय याचा तपास बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली. यावरदोघा आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी शनिवारी दि.२३ एप्रिलला दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.