ETV Bharat / city

भावाच्या घरात चोरीची सुपारी देणाऱ्या चुलत भावासह चोरी करणाऱ्याला अटक; पोलिसांच्या चलाखीपुढे चोरांचा प्लान निष्फळ

author img

By

Published : Oct 14, 2022, 6:39 PM IST

औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील सिरसगाव येथील मागील ५ महिन्यापूर्वी झालेली चोरी व चाकू हल्ल्याची (Theft and stabbing Vaijapur) घटना घडवून आणल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. वीरगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत चोरीची सुपारी देणाऱ्यासह (Cousin and his thief accomplice planned theft ) चोरी करणाऱ्या अशा दोघांच्या मुसक्या आवळून वीरगाव पोलिसांनी त्यांना अटक (Cousin and thief arrested Aurangabad) केली आहे.

planned theft plan Aurangabad Police arrested both
planned theft plan Aurangabad Police arrested both

वैजापूर (औरंगाबाद): शेतजमिनीच्या वादातून चुलत भावानेच कायमचा काटा करण्याच्या हेतूने औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील सिरसगाव येथील मागील ५ महिन्यापूर्वी झालेली चोरी व चाकू हल्ल्याची (Theft and stabbing Vaijapur) घटना घडवून आणल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. वीरगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत चोरीची सुपारी देणाऱ्यासह (Cousin and his thief accomplice planned theft ) चोरी करणाऱ्या अशा दोघांच्या मुसक्या आवळून वीरगाव पोलिसांनी त्यांना अटक (Cousin and thief arrested Aurangabad) केली आहे.


चाकूने हल्ला करत जबरी चोरी- पोपट बापुराव राउत (वय ५० वर्षे, रा. सिरसगाव, ता.वैजापूर ) असे सुपारी देणारा तर योगेश मधुकर हरणे ( वय २८ वर्षे, रा. जातेगाव, ता. फुलंब्री हमु. महालगाव, ता.वैजापूर ) असे चोरी करणाऱ्याचे नाव आहेत. या दोघांना पोलिसांनी अटक करत गजाआड केले आहे. वीरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शरद रोडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार २१ मे २०२२ रोजी तालुक्यातील सिरसगाव येथील शेत गट क्र. २३६ मध्ये राहणाऱ्या संजय बाबुराव राउत यांच्या शेतवस्तीवर दोघांनी चाकू हल्ला करत जबरी चोरी केल्याची घटना घडली होती.

माल निकालो; नही तो बहुत मारेंगे - राउत हे पत्नी व मुलासह घराबाहेर झोपलेले होते. त्यावेळी आलेल्या दोघांपैकी एकाने आई पुष्पा यांच्या गळ्याला चाकू लावला होता. आईचा आवाज ऐकून जागी झालेल्या संतोषला गळ्याला चाकू लावलेला 'माल निकालो; नही तो बहुत मारेंगे' असे पुष्पा यांना म्हणत होता. त्याच्या शेजारी असलेल्या दुसऱ्याच्या एका हातात चाकू तर दुसऱ्या हातात बंदुकी सारखे शस्त्र संतोष यांना दिसले होते. चोरट्यांना प्रतिकार करणाऱ्या संजय यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांच्याकडील रोख रकमेसह ४८ हजार रुपयांचा ऐवज घेवून हे दोघे फरार झाले होते. या प्रकरणी संतोष राउत यांच्या तक्रारीवरून वीरगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.