ETV Bharat / city

Nana Patole criticizes: मुख्यमंत्री मोदी शहांचे हस्तक, खुद्दारांना घाबरण्याची गरज काय ? नाना पटोलेंची खोचक टीका

author img

By

Published : Oct 8, 2022, 1:52 PM IST

महाराष्ट्रातील खराब रस्त्यांची परिस्थिती आता अपघात झाल्याने पुन्हा समोर आली. रोज अपघात होऊन जीवघेणा प्रकार सुरू आहे, हे सर्व पाप ईडी भाजप प्रणित सरकारचे आहे. असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी (Nana Patole criticizes bjp government) सांगितलं.

Congress state president Nana Patole
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

औरंगाबाद : शिवसेना तोडल्यानंतर जे चित्र आपण पाहतोय, दुरून भाजप हा सर्व तमाशा पाहतेय. दुसऱ्यांचे घर तोडणे हा भाजपचा धंदा होता आणि ते यात यशस्वी झाले. निवडणूक आयोगाकडे विषय आहे. संभ्रम न्यायालय निर्माण करतेय, चिन्हाचा विषय पुन्हा निवडणूक आयोगाकडे पाठवला. न्यायव्यवस्थेसंदर्भात संभ्रम निर्माण होणे ही लोकशाहीला घातक आहे. ज्याचे अधिकार असतील ते अधिकारापर्यंत असावेत. हे चित्र कुणाच्या दबावाखाली आहे का ? असे म्हणत स्वत: न्यायाधीश मीडियावर येऊन, मला वाचवा म्हणतात. मोदींचे सरकार आले असता, यावर जनतेने विचार करणे गरजेचे आहे. पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत कुठलाही संभ्रम नाही. ज्याच्या कोट्यातील ते-ते पक्ष लढतील, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी (Nana Patole criticizes bjp government) सांगितलं.

प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले


बस अपघात खराब रस्त्यांमुळे - महाराष्ट्रातील खराब रस्त्यांची परिस्थिती आता अपघात झाल्याने पुन्हा समोर (Nashik bus burn accident) आली. रोज अपघात होऊन जीवघेणा प्रकार सुरू आहे, हे सर्व पाप ईडी भाजप प्रणित सरकारचे आहे, महाविकास आघाडीच्या काळात झालेली कामे, बजेटमध्ये झालेली कामे बंद करून टाकली. काही स्थगित करून टाकली, यामुळे कामे झाले नाहीत. यामुळे विभाग बंद असून मोठे मोठे गड्डे पडले आहेत. खड्डे वाचवण्यामुळेच आता हा अपघात झाला आहे. किती लोकांचा जीव राज्याचे ईडीचे भाजप प्रणित सरकार घेणार ? हा प्रश्न आम्ही विचारतो. असं नाना पटोले यांनी (Nana Patole reacts to Nashik bus burn accident) सांगितलं.

काँग्रेसचा ओबीसी मेळावा - केंद्राचे सरकार ओबीसी वर वारंवार अन्याय करत आहे. विदर्भात आरक्षण आणि मराठवाड्यात त्याच जाती खुल्या वर्गात येतात. समाजाला जागृत करणे ओबीसी मेळाव्याचे ध्येय आहे. ओबीसीत भाजपच्या विरोधात राग दिसतो. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.



राज्यात अस्थिरता - भाजपला लोकांनी प्रलोभणात येऊन निवडून दिले. राज्यात अस्थिरता हे सरकार करत आहे. महाविकास आघाडी सरकारला त्रास देण्याचे काम केले. भ्रष्टाचार, भय आणि भूक देण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाने केला. मागील अडीच वर्ष सरकार पडण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांच्या नेत्यांनी कबूल केलं. म्हणजे सत्तेशिवाय हे राहू शकत नाही. लोकांचा कल भाजपाच्या विरोधातील येत आहे. महाराष्ट्रातील वेदांता सारखे मोठे प्रकल्प गुजरातला देण्याचे काम सरकारने केले. असा आरोप नाना पटोले यांनी केला.


चंद्रकांत पाटीलांचे वक्तव्य अवमानजनक - आई वडिलांना शिव्या दिल्या तर चालेल, पण मोदी शहा यांना त्रास दिलेला चालणार नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले, म्हणजे ही कुठली संस्कृती. जन्मदात्याबद्दल अभिमान असला पाहिजे, त्यांचे संरक्षण करणे त्यांची जबाबदारी घेणे हे त्या मुलांवर असतं, पण चंद्रकांत दादा बोलले ही कोणती हिंदू संस्कृती? हे सर्व स्वार्थासाठी राजकारण चालवलेला आहे. रुपयाची किंमत कागदाबरोबर होत चालली आहे. सत्तेसाठी मी काही पण असे भाजपचे सुरू आहे. दिल्लीच्या तक्तावर शरणागती जाणाऱ्यांना महाराष्ट्र कधी मान्य करणार नाही. अशी टीका नाना पटोले यांनी केली


मुख्यमंत्री हस्तक म्हणतात - मुख्यमंत्री हे इमानदार, ते म्हणाले की मोदी शहाचे हस्तक, मोदी शहा यांनी स्क्रिप्ट लिहिली, तेच मुख्यमंत्री वाचतात. मोदी, शहांची स्क्रिप्ट कोणी ऐकायला तयार नाही. एकनाथ शिंदे फार प्रामाणिक माणूस त्यांनी स्वतः कबूल केले की- ते मोदींचे हस्तक आहेत. एवढा प्रामाणिक माणूस महाराष्ट्राच्या जनतेला मुख्यमंत्री म्हणून मिळाला. बंडखोर म्हणतात आम्ही खुद्दार आहोत, तर मग खुद्दारांना घाबरण्याची गरज काय ? भीती वाटत असेल म्हणून तर तुम्ही सुरक्षा दिली. खुद्दाराणे घाबरायचं कारण काय हा माझा एक सवाल. असल्याचं नाना पटोलेंनी विचारले.



वंचित शिवसेना आघाडी -राज्यात शिवसेना आणि वंचित सोबत येण्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर बोलताना काँग्रेस विचाराला जर मानत असतील, तर आम्हाला कोणालाही सोबत घ्यायला काही अडचण नाही. काय असेल ते बसून चर्चा करू, आम्हाला कुठलीही अडचण नाही. आम्हाला सेक्युलर मते एकत्र राहावीत आणि देश वाचवणे हे ध्येय. देशाच्या विचारासाठी जे कोणी सेक्युलर विचार घेऊन सोबत येत असेल, तर आमचा कुणालाही विरोध नाही, समोरासमोर येऊन चर्चा केली आणि पावले टाकले तरच योग्य राहील. असं नाना पटोले यांनी सांगितलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.