ETV Bharat / city

Aurangabad Azaan : अजान सुरु असताना लाऊडस्पीकरवर गाणे वाजविल्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

author img

By

Published : Apr 25, 2022, 4:33 PM IST

Updated : Apr 25, 2022, 4:52 PM IST

अजाण सुरू असताना ( Azaan ) एक पोलीस उपनिरीक्षकाने ( filed case on Police Sub-Inspector ) मोठ्या आवाजात गाणे लावले म्हणून संबंधीत पोलीसावर सातारा पोलीस ( Satara Police ) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा पोलीस
सातारा पोलीस

औरंगाबाद - अजाण सुरू असताना ( Azaan ) एक पोलीस उपनिरीक्षकाने ( filed case on Police Sub-Inspector ) मोठ्या आवाजात गाणे लावले म्हणून संबंधीत पोलीसावर सातारा पोलीस ( Satara Police ) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कृत्य करणारे पोलीस रेल्वे पोलिसांत उपनिरीक्षक पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे. किशोर गडप्पा मलकूनाईक असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे.

घराच्या मागे असलेल्या मस्जिदच्या दिशेने नमाज पठन सुरु असताना मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर गाणे लावले. यातून 2 धर्मात तेढ निर्माण होऊ शकते आणि वेगवेगळ्या गटात शत्रुत्व वाढू शकते. त्यामुळे ही क्रिया चिथावणीखोर असल्याचे पोलिसांच म्हणणे आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली आहे. रेल्वे सुरक्षा दलमध्ये पोलीस उप निरीक्षकच्या जबाबदार पदावर असताना सुद्धा त्यांनी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांचे आदेश क्र.जा क्र विशा-4/आदेश/औ बाद/ 2022-1575 औरंगाबाद दि. 22/04/2022 अन्वये प्राप्त आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 चे कलम 37(1) व (3) चे उल्लंघन करुन त्यांचे राहते घराचे मागे असणारे मस्जितच्या दिशेने लाऊडस्पीकर ठेवून नमाज पठन करण्याचे वेळी लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजात गाणे संगीत वाजवाले. त्या भागातील नागरिकांनी याबाबत नियंत्रण कक्षात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - Loudspeaker Controversy : सर्वांना कायदा समान, वेगवेगळी भूमिका घेता येणार नाही - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Last Updated : Apr 25, 2022, 4:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.