ETV Bharat / city

Birthday Boy Arrested In Aurangabad : तलवारीने वाढदिवसाचा केक कापणारा बर्थडेबॉय अटकेत

author img

By

Published : Dec 7, 2021, 3:45 PM IST

Updated : Dec 7, 2021, 4:13 PM IST

औरंगाबादेत एका बर्थडेबॉयला केक कापणे चांगलेच महागात पडले आहे. तलवारीने केक कापल्यामुळे त्याला पोलिसांनी अटक ( Birthday Boy Arrested In Aurangabad ) केली आहे. याप्रकरणी त्याविरूद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

Birthday Boy Arrested In Aurangabad
तलवारीने वाढदिवसाचा केक कापणारा बर्थडेबॉय अटकेत

औरंगाबाद - जुना मोंढा परिसरात सार्वजनीक ठिकाणी धारदार तलवारीने केक कापून स्टेटस ठेवणार्‍या बर्थडेबॉयच्या गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवार मुसक्या आवळल्या ( Birthday Boy Arrested In Aurangabad ) आहेत. त्याच्या ताब्यातून २२ इंचाची धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे. हर्षद रोहीदास गोरमे रा. रोहीदास नगर, जुना मोंढा असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

तलवारीने वाढदिवसाचा केक कापला

तरुणांमध्ये नवा ट्रेण्ड -

गेल्या काही दिवसांपासून शहरांमध्ये वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. यामुळे अनेक तरुण वाढदिवसानिमित्त धारदार शस्त्राने केक कापतात. परवानगी नसताना हा प्रकार सुरू असल्याने पोलिसांतर्फे कारवाई करण्यात येत आहे.

सूत्रांनी दिली माहिती -

अशीच काहीशी खात्रीलायक बातमी गुन्हे शाखेला मिळाली होती. हर्षद याचा वाढदिवस असल्याने त्याने सार्वजनीक ठिकाणी वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याने केक कापण्यासाठी धारदार तलवारीचा वापर केला. यावेळी काढलेले व्हिडिओ त्याने स्टेटस देखील ठेवले. दरम्यान गुन्हे शाखेचे पथकाला याची माहिती मिळताच जुना मोढा भागात शोध घेतला असता तो घरी मिळून आला. त्याच्या घरातून तलवार जप्त करण्यात आली. याप्रकरणी शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - School Managers Assaulted 17 Girls : 17 मुलींवर बलात्काराचा प्रयत्न, दोन शाळा व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल

Last Updated : Dec 7, 2021, 4:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.