ETV Bharat / city

Aurangabad Renamed Issue : संभाजीनगर मुद्द्यावर काँग्रेस माजी पदाधिकाऱ्यांची राजीनाम्याची स्टंटबाजी

author img

By

Published : Jul 2, 2022, 5:25 PM IST

औरंगाबाद जिल्ह्याच्या नामकरणाचा मुद्दा 1988 पासून राजकारणाचा भाग राहिला आहे. शिवसेनेने पक्षाचे धोरण सांगून प्रत्येक निवडणुकीत नामंतरचे भांडवलं केले. त्याला भाजपने साथ दिली. मात्र आता राज्य सरकारने संभाजीनगर नावाचा प्रस्ताव मंजूर करताच अनेकांनी त्यावर राजकारण करायला सुरुवात केली. यात कोणी श्रेय घेतल तर कोणी आपल्याला निर्णय मान्य नसल्याचे सांगत पक्ष सोडत आहे. मात्र यात काही जणांनी स्टँटबाजी केल्याचे समोर आले.

Aurangabad Renamed Issue
कॉंग्रेस

औरंगाबाद - औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याच्या निर्णय ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेट बैठकीत जाताजाता घेतला. मात्र, त्यानंतर काँग्रेसमध्ये शहरातील आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले. यामध्ये काही पदाधिकाऱ्यांनी स्टंटबाजी केल्याचे समोर आले आहे. काही माजी पदाधिकाऱ्यांनी तर सदस्य नसलेल्या काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर राजीनामा दिल्याचं सांगत वाह वाह मिळवण्याचा प्रयत्न केला असून या स्टँटबाजची दखल घेण्याची मागणी माजी शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी केली आहे.

अनेकांनी केली स्टँटबाजी - औरंगाबाद जिल्ह्याच्या नामकरणाचा मुद्दा 1988 पासून राजकारणाचा भाग राहिला आहे. शिवसेनेने पक्षाचं धोरण सांगून प्रत्येक निवडणुकीत नामंतरचे भांडवलं केले. त्याला भाजपने साथ दिली. मात्र आता राज्य सरकारने संभाजीनगर नावाचा प्रस्ताव मंजूर करताच अनेकांनी त्यावर राजकारण करायला सुरुवात केली. यात कोणी श्रेय घेतलं तर कोणी आपल्याला निर्णय मान्य नसल्याच सांगत पक्ष सोडत आहे. मात्र यात काही जणांनी स्टँटबाजी केल्याच समोर आले आहे. जिल्हा काँग्रेसमध्ये जवळपास तीनशे जणांनी पदाचे राजीनामे दिले. सोशल मीडियावर आपली पत्र त्यांनी टाकली. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचे अनेकांनी स्वागत केले. त्यांचं कौतुक केल त्यामुळे या परिस्थितीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत काँग्रेसच्या पदाचा आधीच राजीनामा देणाऱ्या, तर पक्ष सोडणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर संभाजीनगरच्या मुद्द्यावरून राजीनामा देत असल्याचे सांगत पोस्ट टाकल्याचे पाहायला मिळाले. यासाठी काही लोकांनी खोटे लेटर पॅड देखील तयार केले. त्यामुळे अशा लोकांची दखल पक्षाने घ्यावी अशी मागणी माजी शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी केली आहे.

प्रतिक्रिया

राज्यात अनेकांचे राजीनामे - उद्धव ठाकरे सरकार पायउतार होत असताना गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचा नामांतराचा प्रस्ताव पारीत केला. विशेषतः हा प्रस्ताव पारित करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी याला साथ दिली. याचाच राग मनात धरत एका रात्रीतून जवळपास तीनशे पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा त्याग केल्याच समोर आल. मंत्रिमंडळाने घेतला निर्णय काँग्रेच्या मंत्र्यांनी जरी मान्य केला असला तरी स्थानिक पातळीवर हा निर्णय मान्य नसल्याच सांगत शहर जिल्हाध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी सर्वात आधी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकमागे एक राजीनामे आले. राज्यातून सातशे ते आठशे लोकांनी राजीनामा दिल्याची माहिती माजी शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी दिली. जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात भूकंप झाला असून आता आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस अडचणीत येईल अस बोललं जात आहे.

पक्षाच्या अजेंडा विरोधात कृत्य - जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने शिवसेनेला नेहमी विरोध करत संभाजीनगर नामकरणाला विरोध केला. वेळप्रसंगी न्यायालयीन लढाई लढली. 2019 मध्ये सत्तेत समाविष्ट होत असताना शहराच्या नामकरणाचा विषय कुठेही नव्हता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अचानक हा प्रस्ताव आणला. त्यावेळी काँग्रेस पक्षाने त्याला पाठिंबा द्यायला नको होता. मात्र तरी देखील पाठिंबा देण्याचे काम करत पक्षाच्या अजेंडा विरोधात काम केल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाल्याने राजीनामा स्तर सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.

तीनशे जणांनी दिला राजीनामा - राज्य सरकारने बुधवारी सायंकाळी निर्णय जाहीर करताच काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष हिशाम उस्मानी आणि शहर प्रवक्ते मोसीन अहमद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रात्रीतून जिल्ह्यातील जवळपास 300 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष आणि पक्षाकडे आपला राजीनामा पाठवला आहे. पक्षाच्या या भूमिकेमुळे स्थानिक पातळीवर काँग्रेस तोंडावर पडला आहे. आगामी महानगर पालिका निवडणुकीत पक्षाला मानणारे कार्यकर्ते आणि मतदार यांना काय तोंड दाखवायचं असा प्रश्न असल्याने आपण राजीनामा दिला असल्याचे शहर प्रवक्ते मोसीन अहमद यांनी सांगितले.

मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्तावाला मंजुरी - उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाची महत्त्वाची शेवटची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर ( Aurangabad renamed Sambhajinagar ) आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव ( Dharashiv Naming Of Osmanabad ) करण्याच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मंजुरी दिली होती. अनेक वर्षापासून शिवसेनेच्या अजेंड्यावर असलेला हा महत्त्वाचा निर्णय आज अखेर मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासोबतच नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव ( Mumbai Airport To Be Name As D B Patils Name ) देण्याच्या निर्णयासही मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा - Amravati Chemist Murder : उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मांबाबत केलेल्या पोस्टमुळेचं; पोलीस उपायुक्तांनी केलं स्पष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.