ETV Bharat / city

Aurangabad Crime : अनेक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संतोष राठोडला अटकेत

author img

By

Published : Jan 22, 2022, 11:00 AM IST

Updated : Jan 22, 2022, 11:56 PM IST

राज्याने मोबदला दिलेल्या शेतकऱ्यांना गाठून त्यांच्याकडून सचिन उर्फ संतोष राठोड याच्यासह त्याच्या साथीदारांनी 25 ते 30 टक्के व्याजाचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवणूक करायला लावले. औरंगाबाद पोलीसांनी संतोष राठोडला ( Aurangabad police arrested santosh rathod ) अखेर पोलिसांनी अटक केली आहे.

Aurangabad police
Aurangabad police

औरंगाबाद - राज्यातील बहुचर्चित 30 - 30 घोटाळ्यातील मास्टरमाईंड असलेला संतोष राठोडला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी रात्री दुसऱ्या तक्रारदाराने तक्रार देताच, शनिवारी मध्यरात्री ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

असा आहे तिथेच घोटाळा
डीएमआयसी, समृद्धी महामार्ग तसेच धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन, चिकलठाणा, करमाड आणि कन्नड या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. शासनाने या शेतकऱ्यांना कोट्यावधी मध्ये मोबदला दिला आहे. अशा शेतकऱ्यांना गाठून त्यांच्याकडून सचिन उर्फ संतोष राठोड याच्यासह त्याच्या साथीदारांनी 25 ते 30 टक्के व्याजाचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवणूक करायला लावले. सुरुवातीला शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला मात्र तो मोबदला मागील एक वर्षापासून देणे बंद करण्यात आले. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे पैसे या 30 - 30 घोटाळ्यांमध्ये अडकून गेले.

पोलीस अधिकारी माध्यामांना माहिती देताना
यापूर्वीही झाला होता गुन्हा दाखलगुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याने काही महिन्यांपूर्वी बिडकीन पोलिसात एका महिला तक्रारदाराने आपली तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र महिलेने दुसऱ्या दिवशीच आपली तक्रार मागे घेतल्याने आरोपी संतोष राठोड यांना जामीन मिळाला होता. शुक्रवारी दौलत राठोड या तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर बिडकीन पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आणि त्यावरून कृष्णा राठोड, पंकज चव्हाण आणि संतोष उर्फ सचिन राठोड यांच्यावर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 30 लाखांची फसवणूक केली अस तक्रारदाराने नमूद केलं होतं. त्यावरून रात्री उशिरा संतोष उर्फ सचिन राठोड याला पोलिसांनी अटक केली आहे.हेही वाचा - चंद्रपुर महाऔष्णिक वीज केंद्राला पाच कोटींचा दंड; राष्ट्रीय हरित लवादाचा महत्वपूर्ण निकाल
Last Updated : Jan 22, 2022, 11:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.